Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात भीषण आग; आयसीयूमध्येच आगीचा भडका, 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Top News

सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात भीषण आग; आयसीयूमध्येच आगीचा भडका, 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Odisha Government Hospital Fire | ओडिशामधून (Odisha) धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओडिशामधील सर्वात मोठ्या सरकारी रूग्णालयाला भीषण (Odisha Government Hospital Fire) आग लागली आहे. या दुर्दैवी घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Dubai Airport: दुबई इंटरनॅशन विमानतळावर इराणचा मोठा ड्रोन हल्ला; आगीचा आकाशात मोठा भडका, उड्डाणे तात्पुरती बंद

रूग्ण गाढ झोपेत असतानाच आयसीयूमध्ये भीषण आग

प्राथमिक माहितीनुसार, आज (16 मार्च) पहाटे ओडिशामधील एससीबी (SCB) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये भीषण आग लागली. पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. यादरम्यान रूग्णालयातील आयसीयूमध्ये असलेले रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत होते. तर ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता तिथे आगीचा भडका उडाला. आयसीयूमध्ये मॉनिटर्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि व्हेंटिलेटर असल्यामुळे ही आग वेगाने पसरली. तसेच शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे.

आग जेव्हा लागली तेव्हा आयसीयूमध्ये असलेल्या रूग्णांना तातडीनं बाहेर पडणं शक्य नव्हतं. तर दुसरीकडे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली होती. तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं धूर बाहेर जाण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडल्या. मात्र, आयसीयूत असलेल्या रूग्णांना स्वत:हून लगेच बाहेर पडणे शक्य न झाल्याने काही रुग्णांचा धुरामुळे गुदमरून जागीच मृत्यू झाला आहे.

दुर्दैवी घटनेत 10 जणांचा मृत्यू, 5 रूग्णांची प्रकृती गंभीर

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. रूग्णालयात लागलेली आग एवढी मोठी होती की अग्निशमन दलाला ती विझवणे मोठे आव्हान होते. तरीही अग्निशमन दलाने जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवले आणि 50 हून अधिक रूग्णांना बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले. सध्या जखमी रूग्णांना नव्या मेडिसिन आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. यातील 5 रूग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरू आहेत. यामध्ये रूग्णालयातील काही कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. तर या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेची दखल ओडिशा सरकारने घेतली आहे. तसेच सरकारने आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या घटनेत रूग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts