Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • व्हायरल ‘महाकुंभ गर्ल’ मोनालिसा लग्नाच्या वेळी अल्पवयीन होती का? नेमका काय आहे प्रकरण?
Top News

व्हायरल ‘महाकुंभ गर्ल’ मोनालिसा लग्नाच्या वेळी अल्पवयीन होती का? नेमका काय आहे प्रकरण?

Monalisa News

Mahakumbh Viral Girl Monalisa: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा ही तिच्या लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने (National Commission for Scheduled Tribes) दावा केला आहे. की ती फर्मान खानसोबत झालेल्या विवाहा वेळी अल्पवयीन होती. या प्रकरणात नेमका काय प्रकार आहे, याबाबत मोठी चर्चा सुरू असून तपासात नवे खुलासे समोर येत आहेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने ((National Commission for Scheduled Tribes) दावा केले आहे की व्हायरल झालेली “महाकुंभ गर्ल” मोनालिसा भोसले ( Monalisa Bhosale) ही फार्मान खानसोबत विवाहाच्या वेळी अल्पवयीन होती.

हेही वाचा: YOPD म्हणजे नेमकं काय? कोणाला धोका आणि सुरुवातीची लक्षणे कोणती?

१७ मार्च २०२६ रोजी वकील प्रथम दुबे (Pratham Dubey) यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार तपस पथकाने या प्रकरणाशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि नोंदी तपासल्या.

तपासात असे समोर आले की शाळेतील नोंदी आणि आरोग्य केंद्राच्या माहितीप्रमाणे तिचा जन्म ३० डिसेंबर २००९ रोजी झालेला आहे. त्यानुसार ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या कथित विवाहावेळी तिचे वय सुमारे १६ वर्षे होते.

विवाह नोंदणी

याशिवाय विवाह नोंदणीसाठी वापरलेल्या जन्मतारखेच्या प्रमाणपत्रात त्रुटी असल्याचेही आढळले. या संशयास्पद नोंदींमुळे तपास पथकाने संबंधित विवाह प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस करण्याचे संकेत दिले आहेत.

या प्रकरणात महेश्वर पोलीस ठाण्यात अपहरणासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Anurag IG यांच्या माहितीनुसार FIR दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

मोनालिसा कशी प्रसिद्ध झाली?

Prayagraj Maha Kumbh Mela 2025 दरम्यान रुद्राक्ष माळा विकताना मोनालिसा भोसले तिच्या आकर्षक डोळ्यांमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली. तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाले आणि ती देशभर प्रसिद्ध झाली.

त्यानंतर तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स आणि चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली. तिने मल्याळम चित्रपट “Nagamma” मध्ये काम केले असून, “The Diary of Manipur” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी सुरू आहे. ती सोशल मीडियावर विविध ब्रँड्ससोबतही जोडलेली आहे आणि चाहत्यांशी संपर्क ठेवते.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts