Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मोठी अपडेट! MPSC मार्फत गट-ब संयुक्त परीक्षा 2026 साठी भरती जाहीर; अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या
Top News

मोठी अपडेट! MPSC मार्फत गट-ब संयुक्त परीक्षा 2026 साठी भरती जाहीर; अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या

MPSC

Eligibility Criteria for Maharashtra Group B Posts: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा अयोग (MPSC) मार्फत गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी 552 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊयात अर्जाची शेवटची तारीख आणि या भरतीची सर्व डिटेल्स.

राज्यातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा अयोग (MPSC) मार्फत गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त सर्व परीक्षा 2026 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भारतीअंतर्गत एकूण 552 पदे भरण्यात येणार असून याची परीक्षा 14 जून रोजी होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तसेच ही परीक्षा महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.

हेही वाचा: Forensic Expert कसे बनावे? कोणता कोर्स करावा आणि किती पगार मिळतो? जाणून घ्या एका क्लिकवर

पदांची माहिती

MPSC मार्फत गट-ब संयुक्त परीक्षा 2026 मध्ये एकूण 552 पदे भरण्यात येणार आहेत.

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) : ०८

राज्य कर निरीक्षक (गट-ब): २४०

पोलीस उपनिरीक्षक (गट-ब): ३०४

शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी:
पुरुष उंची: किमान 165 सेमी
महिला उंची: किमान 157 सेमी
पुरुष छाती: किमान 79 सेमी

वयोमर्यादा

सहाय्यक कक्ष अधिकारी: 18 ते 38 वर्षे
राज्य कर निरीक्षक: 18 ते 38 वर्षे
पोलीस उपनिरीक्षक: 19 ते 31 वर्षे
राखीव प्रवर्गांना शासकीय नियमानुसार सवलत लागू

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग: 394/-
मागासवर्गीय / EWS / अनाथ: 294/-

अर्ज कसा करावा?

MPSC गट-ब संयुक्त परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. पात्र उमेदवारांनी खालील पद्धतीने अर्ज करावा:

MPSC च्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जा
“Online Application” किंवा संबंधित भरती लिंक निवडा
नवीन नोंदणी (New Registration) करून लॉगिन तयार करा
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील योग्य प्रकारे भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, सही इ.)
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा
सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा
अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts