Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. स्वत:ला अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी समजणाऱ्या अशोक खरातने अनेक महिलांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. नराधम खरात हा विवाहित महिला आणि तरूणींना फसवून, अधोरी विधी करून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत होता. तर आता अशोख खरातचे काही लैंगिक शोषणाचे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत, त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – मोठा ट्विस्ट! नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ नेमका कोणी केला शूट? तपासात धक्कादायक खुलासा
ढोंगीबाबा खरातचे लैंगिक शोषणाचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
अशोक खरातने महिलांसोबत केलेल्या लैंगिक शोषणाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अशोक खरात प्रकरणातील महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे काही व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि या व्हिडीओतून महिलांची ओळख उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिन्ही आरोपींना हे व्हिडीओ तातडीनं डिलिट करण्याचे आदेशही देत पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधील योगेश आढाव, राहुल शिंदे आणि बीडमधील संदीप गरजे अशी तीन आरोपींची नावे आहेत. तर आरोपी राहुल शिंदे याने त्याचा मित्र योगेश आढावला खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवले होते. तर योगेश आढावने हे व्हिडीओ संदीप गरजेला पाठवले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
या तिन्ही आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या होत्या. तर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याविरोधात अहिल्यानगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 294 (2), 3 (5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अशोक खरातला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. यावेळी तपासादरम्यान त्यांना एक पेनड्राईव्ह सापडला होता ज्यात 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. तसेच अशोक खरातला अटक केल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसा स्थानकात अशोक खरातविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केला आहे.












