• Home
  • बिजनेस
  • राम नवमीच्या मुहूर्तावर सोन्या‑चांदीचा भाव आसमानाला भिडला; जाणून घ्या आजचा बाजार भाव
Top News

राम नवमीच्या मुहूर्तावर सोन्या‑चांदीचा भाव आसमानाला भिडला; जाणून घ्या आजचा बाजार भाव

gold silver rate

Gold Silver Price | मागील काही दिवसांपासून सोन्या (Gold) आणि चांदीच्या (Silver) किंमतींमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. कधी सोने-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate) वाढ होताना दिसत आहे तर कधी अचानक सोन्या-चांदीचे भाव कमी होताना दिसत आहेत. तीन दिवसांपूर्वीच सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली होती, तर चांदीचे दरही कमी झाले होते. अशातच आता आज राम नवमी (Ram Navami) असून राम नवमीच्या या खास मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – विश्वास, वाद अन् रणनीती! राज्यसभा रणांगणापूर्वी ठाकरे गटात खळबळ; बैठकीतील इनसाईड अपडेट्स समोर

आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर काय?

राम नवमीच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. कारण आज (26 मार्च) संपूर्ण देशभरात सोने आणि चांदीच दर आसमानाला भिडले आहेत. राम नवमीच्या निमित्ताने ज्वेलरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता सोने आणि चांदीचे दर अचानक वाढले आहेत.

दिल्लीतील बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये कालच्या तुलनेत वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत 24 कॅरेज प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव 1,46,830 रूपये आहे. काल दिल्लीत सोन्याचा भाव 4,900 रूपयांनी वाढला होता. तर कोलकाता, हैद्राबाद, चेन्नई आणि मुंबईमध्ये 1,46,680 रूपये एवढा सोन्याचा भाव आहे. तसेच पुणे आणि बंगळुरूमध्ये 1,46,680 प्रति 10 ग्राम एवढा सोन्याचा भाव आहे.

दुसरीकडे चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज चांदीचे भाव वाढून 2,50,100 रूपये प्रति किलोग्रावर जाऊन पोहोचले आहेत. कालच्या चांदीच्या भावाच्या तुलनेत आज जवळपास 11,250 रूपयांची तेजी दिसून येत आहे.

सोने-चांदीचे दर वाढण्याचे कारण काय?

सध्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देशांवर मोठा परिणाम झाला असून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच चांदीची इंडस्ट्रीयल डिमांड यामुळे चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जानेवारी 2026 मध्ये चांदीचे दर हे 4 लाख प्रति किलोग्रामवर जाऊन पोहोचले आहेत. त्यात सध्या संपूर्ण देशभरात सण-उत्सव आणि लग्नसराईचा सीझन असल्यामुळे सोन्याची आणि चांदीची मागणी वाढत आहे. तसेच जर मध्य पूर्वेतील युद्ध कायम राहिले तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts