Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • ईदच्या सुट्ट्यांनंतर घरी परतताना काळाचा घाला! प्रवासी बस पद्मा नदीत कोसळली; 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Top News

ईदच्या सुट्ट्यांनंतर घरी परतताना काळाचा घाला! प्रवासी बस पद्मा नदीत कोसळली; 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Bangladesh Bus Accident | बांगलादेशमध्ये (Bangladesh) भीषण अपघात (Accident) झाला आहे. ईदच्या (Eid) सुट्ट्या संपवून घरी परतत असताना प्रवाशांवर काळाने झडप घातली. प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत (Padma River) कोसळून मोठा अपघात घडला. या अपघातात 23 प्रवाशांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण बांगलादेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – भीषण अपघात! प्रवासी बस-ट्रकची जोरदार टक्कर; दोन्ही वाहनांना आग, 8 जणांचा होरपळून मृत्यू

ईद साजरी करून घरी परतणाऱ्या प्रवाशांचा परतीचा प्रवास ठरला जीवघेणा

बुधवारची संध्याकाळ प्रवाशांसाठी घातकी ठरली. राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनल येथे फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना एक प्रवासी बस थेट पद्मा नदीत कोसळली. बुधवारी संध्याकाळी 5.15 च्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. ईद साजरी करून ढाका येथे परतणाऱ्या प्रवाशांचा परतीचा प्रवास जीवघेणा ठरला. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते जे ईदची सुट्टी साजरी करून ढाकाकडे निघाले होते. यावेळी प्रवाशांनी भरलेली बस फेरीकडे जात असताना एका छोट्या बोटीला धडकली. या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीच्या खोल पात्रात कोसळली. या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातात आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून बेपत्ता प्रवाशांचा शोध अद्याप सुरू आहे.

ईदचा सण साजरी करून घरी परतत असताना अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे बांगलादेशात शोककळा पसरली आहे. नदी ओलांडत असताना फेरीवर चढण्याची घाई आणि सुरक्षेच्या नियंमांचं उल्लंघन केल्यामुळे हा अपघात घडला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बांगलादेश सरकारने दिले आहेत.  तर या अपघातानंतर बांगलादेशमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसचे या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts