Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, 30 व्या वर्षी संपला जीवनप्रवास
Top News

लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, 30 व्या वर्षी संपला जीवनप्रवास

Actress Harshil Kalia Dies | नुकताच मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानी चित्रपटसृष्टीतून (Rajasthani Film Industry) धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया (Harshil Kalia) हिचा भीषण कार अपघात (Car Accident) झाला आहे. या अपघातात हर्षिल कालियाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजस्थानी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम! रामनवमी का साजरी केला जाते? जाणून घ्या खास महत्त्व

कसा झाला अभिनेत्री हर्षिलचा अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास हर्षिल कालिया स्वत:ची कार चालवत होती. ती जयपूरमधील शिप्रा पथ रोडवरून घरी जात असताना तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तिची कार दुभाजकाला जोरात धडकली. कारचा वेग एवढा जास्त होता की कार पलटी होऊन रस्त्याच्या मधोमध जाऊन पडली. या अपघातात हर्षिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

अपघात झाल्यानंतर तेथील परिसरातील लोकांनी तातडीनं धाव घेत हर्षिलला कारमधून बाहेर काढले आणि तिला जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान हर्षिलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षिलने वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनं मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

हर्षिलच्या निधनानं कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

हर्षिलच्या अपघातानंतर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा सखोल तपास करत आहेत. तर हर्षिलच्या अकाली निधनानं तिच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हर्षिलने ‘क्राइम नेक्स्ट डोअर’ वेब सीरिजमध्ये साकारलेली महत्त्वाची भूमिका

हर्षिल कालिया ही एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली होती. डिझ्नी प्लस हॉटस्टारवरील (Disney Plus Hotstar) ‘क्राइम नेक्स्ट डोअर’ (Crime Next Door) या वेब सीरिजमध्ये हर्षिलने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच ती ‘मिस दिवा राजस्थान 2021’ ची फर्स्ट रनर-अप देखील होती.

हर्षिलने अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे. विशेष म्हणजे हर्षिलने काही काळ न्यूज अँकर म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. हर्षिलचे वडील हे पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित असून ते एका खाजगी वृत्तपत्रात काम करतात. त्यामुळे हर्षिलने अभिनय क्षेत्रासोबत पत्रकारितेमध्येही आपली ओळख निर्माण केली होती.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts