Petrol-Diesel Prices | सध्या मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या तिन्ही देशांमधील संघर्ष जास्तच वाढत चालला आहे. त्यामुळे आता या युद्धाचा फटका अन्य देशांना बसताना दिसत आहे. अमेरिका, इस्त्रायल इराणवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे. तर दुसरीकडे इराणही प्रतिहार करताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा (Hormuz Strait) मार्ग बंद केला आहे. त्यामुळे या सामुद्रधुनीत अनेक देशांचे तेलाचे, गॅसचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरात तेलाच्या आणि गॅसच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
हेही वाचा – खरातला कोर्टाचा झटका; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, उद्याही पुन्हा न्यायालयात हजर करणार, नेमंक कारण काय?
पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किती रूपयांनी झाली वाढ?
युद्धाच्या तणावामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. Indian Oil Corsporation (IOCL) कडून प्रिमियम इंधनाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. IOCL कंपनीने 100 ऑक्टोन पेट्रोल म्हणजेच XP100 पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. यामध्ये दिल्लीत XP100 पेट्रोलची किंमत 149 रुपयांनी वाढवून 160 रूपये प्रती लिटर करण्यात आली आहे.
IOCL कंपनीने प्रीमियम डिझेलच्याही किंमतीत वाढ केली आहे. प्रीमियम डिझेल ‘एक्स्ट्रा ग्रीन’ची किंमत 91.49 रूपये एवढी होती. तर आता ती वाढवून 92.99 रूपये प्रति लिटर करण्यात आली आहे. प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर IOCL च्या आउटलेट्सवर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सामान्य जनतेच्या खिशाला झळ बसणार आहे.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलांच्या किमतींमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. भारतात एकिकडे प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर आहेत.










