PM Narendra Modi On Instagram | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे फक्त भारतातच (India) नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचे चाहते खूप मोठ्या संख्येत असल्याचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी नेहमीच चर्चेत असतात. तर आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण पंतप्रधान मोदींनी एक असा विक्रम (Record) केला आहे जो जगभरात कोणालाही जमलेला नाहीये.
हेही वाचा – “…तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य; नेमकं घडलं काय?
पंतप्रधान मोदींनी कोणता मोठा विक्रम केला?
पंतप्रधान मोदी यांची क्रेझ फक्त प्रत्यक्ष जनतेमध्येच नाही तर सोशल मीडियावरही (Social Media) मोठ्या प्रमाणात आहे. ही गोष्ट आज खऱ्या अर्थाने सिद्ध झालीये. कारण पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) 100 दशलक्ष फॉलोअर्स (Followers) म्हणजेच तब्बल 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. त्यांचा हा विक्रम विश्व विक्रम (World Record) ठरला असून ते जागतिक रेकॉर्ड करणारे एकमेव पहिले नेते ठरले आहेत. यामध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनाही मागे टाकलंय.
2014 पासून पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सक्रिय
2014 साली पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रावर खाते उघडले होते. तेव्हापासूनच त्यांची लोकप्रियता वाढत गेली होती. विशेष म्हणजे ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय देखील असतात. ते या प्लॅटफॉर्मवरून तरूणाईशी, जनतेशी संवाद साधताना दिसतात. त्यामुळे आज ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आहेत.
दरम्यान, इन्स्टाग्राम फॉलोअर्सबाबतीत सांगायचं झालं तर, पंतप्रधान मोदी हे आज जगात सगळ्यात जास्त फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत. तर त्यांच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे असून त्यांचे फॉलोअर्स 43.2 दशलक्ष एवढे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे असून त्यांचे फॉलोअर्स 15 दशलक्ष एवढे आहेत.












