Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राहुल गांधी निवडणूक आयोगाची बदनामी करतायेत, न्यायमूर्तींसह २७१ सनदी अधिकाऱ्यांचे खुले पत्र
Top News

राहुल गांधी निवडणूक आयोगाची बदनामी करतायेत, न्यायमूर्तींसह २७१ सनदी अधिकाऱ्यांचे खुले पत्र

rahul-gandhi-election-commission-open-letter

काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यासह देशातील विविध पक्षातील राजकीय नेते सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. या मुद्द्याला धरून देशातील १६ न्यायमूर्ती, १२३ निवृत्त सनदी अधिकारी आणि १३३ सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी निवडणूक आयोगाच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपले खले पत्र लिहित सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश भूषण गवई यांचे लक्ष वेधले आहे. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन मतचोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी विरोधकांकडून काही उदाहरण समोर आणली आहेत. मात्र, त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे या अधिकाऱ्यांचे मत आहे.

 हेही वाचा – बिश्नोईचा भाऊ अनमोल भारतात दाखल; बाबा सिद्दीकी हत्यांकांडाचे मोठे खुलासे होणार?

काय आहे या पत्रात?

या खुल्या पत्रात निवडणूक आयोगाविरोधातील कथित आरोपांची निंदा करण्यात आली आहे. आम्ही समाजातील ज्येष्ठ नागरिक या बाबतीत चिंता व्यक्त करतो की, भारतीय लोकशाहीवर बळाचा उपयोग नाही तर, तिच्या अनेक आधारभूत संस्थांविरोधात घातक वक्तव्य करून हल्ला करण्यात येत आहे. काही नेते हे नाटक वठवत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत असे या पत्रात म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निष्ठेवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला

या पत्रानुसार, कधी भारतीय लष्कराच्या शौर्यावर तर त्यांच्या साहसावर प्रश्न उठवण्यात आले. कधी न्यायपालिकांवर, संसदेवर आणि तिथे काम करणाऱ्यांवर सवाल करण्यात आले. आता त्यांच्या टार्गेटवर निवडणूक आयोग आहे. आयोगाच्या निष्ठेवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला करण्यात येत आहे. या पत्रात राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते वारंवार निवडणूक आयोगावर हल्ला चढवत आहेत. निवडणूक आयोग मत चोरी करणाऱ्यांसोबत असल्याविषयीचे ठोस पुरावे पण असल्याचा त्यांचा दावा आहे. याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. गांधी यांनी देशातील निवडणूक मत चोरी झाल्याचा आरोप केला आहे. तर त्यांच्या हायड्रोजन बॉम्बची अजूनही देशवासियांना प्रतिक्षा आहे.

आयोगाविरोधातील कथित आरोपांची निंदा

निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ हे पत्र लिहिण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाला बदनाम करत असल्याचा आरोप या 272 दिग्गजांनी लावला आहे. त्यांनी या पत्रात काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत तीव्र निषेध नोंदवला आहे. या खुल्या पत्रात निवडणूक आयोगाविरोधातील कथित आरोपांची निंदा करण्यात आली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts