Parineeti Chopra baby name reveal – बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्डा या लोकप्रिय जोडीने 19 ऑक्टोबर रोजी गोंडस बाळाला जन्म दिला होता. ऑक्टोबर महिन्यात दोघेही आई बाबा झालेत. आणि त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या गोंडस बाळाचे नाव काय ठेवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. आता आई बाबांनी या गोंडस लेकाचे नामकरण केले असून याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत माहिती शेअर केली आहे.
काय आहे नाव
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी त्यांच्या मुलाचे नाव नीर ठेवले आहे. चिमुकल्या बाळाचे नाव जाहीर करत समाज माध्यमांवर परिणितीने खास पोस्ट शेअर केली. या पोस्ट मध्ये आई बाबांनी चिमुकल्या बाळाच्या पायाचे चुंबन घेतानाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये संस्कृत श्लोक लिहीत चिमुकल्या बाळाचे नाव रिव्हील केले आहे. “जमस्य रुपम, प्रेमस्य स्वरूपम – तत्र एवं नीर ! आम्ही त्याचे नाव ठेवलेय Neer – शुद्ध, दिव्य आणि अमर्याद” अशा स्वरूपात कॅप्शन देत त्यांनी चाहत्यांसोबत बाळाचे नाव शेअर केले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर कमेंट्स चा वर्षाव
सोशल मीडियावर अभिनेत्री परिणीती चोप्राने बाळाचे नाव रिव्हिल केल्यानंतर चाहत्यांनी त्या पोस्ट वर कमेंटचा वर्षाव केला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अभिनेत्रींनी देखील कमेंट केल्या असून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी सप्टेंबर 2023 मध्ये लग्नगाठ बांधली होती. उदयपूर येथे त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. आणि आता चिमुकल्या नीर च्या येण्याने दोघेजण आई बाबा म्हणून नवीन जबाबदारी पार पाडत आहे.
हे हि वाचा – तामिळ अभिनेत्री मान्या आनंदचे धनुषच्या मॅनेजरवर गंभीर आरोप
परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत आई बाबा होणार असल्याचे सांगितले होते. चाहत्यांना हि बातमी ऐकून खूप आनंद झाला होता. यावेळी अभिनेत्रीने एका केक वर 1+1= 3 असं कॅप्शन देत केकचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर परिणीती चोप्राच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झाले. आता चिमुकला नीर 1 महिन्याचा झाला असून त्याचे नामकरण देखील करण्यात आले.












