• Home
  • राजकारण
  • मोठा राजकीय भूकंप! राघव चढ्ढा आपमधून बाहेर पडताच अण्णा हजारे म्हणाले…
Top News

मोठा राजकीय भूकंप! राघव चढ्ढा आपमधून बाहेर पडताच अण्णा हजारे म्हणाले…

raghav chadha

Raghav Chadha: आम आदमी पक्षाचे खाजदार राघव चढ्ढांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. यावर अण्णा हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

देशातील राजकारणात काळ मोठी खळबळ उडाल्याचं पहिला मिळालं. गेली अनेक दिवस आम आदमी पक्षात (AAP) सुरू असलेल्या अंतर्गत हालचालींनंतर राघव चढ्ढा यांनी पक्षातून बाहेर पडल्याच्या चर्चाना वेग आला असून, त्यांच्या सोबत काही इतर खासदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर अली आहे. २४ एप्रिल रोजी या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा: ग्लोइंग लूकसाठी ‘या’ लिपस्टिक शेड्स नक्की ट्राय करा; सर्व स्किन टोनसाठी आहेत बेस्ट

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, पक्षांतर रोखण्यासाठी संसदेत कठोर कायदा असणे आवश्यक आहे, अन्यथा नेते वैयक्तिक स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलत राहतील.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, आज राजकारणात सत्ता आणि पैशाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे समाज आणि देशाच्या हिताऐवजी वैयक्तिक फायद्याला प्राधान्य दिलं जात आहे. त्यांनी लोकांनी निवडणुकीत चारित्र्यवान आणि प्रामाणिक नेत्यांची निवड करावी, असंही आवाहन केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts