Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • ग्लोइंग लूकसाठी ‘या’ लिपस्टिक शेड्स नक्की ट्राय करा; सर्व स्किन टोनसाठी आहेत बेस्ट
ताज्या बातम्या

ग्लोइंग लूकसाठी ‘या’ लिपस्टिक शेड्स नक्की ट्राय करा; सर्व स्किन टोनसाठी आहेत बेस्ट

lipstick
100

Best Lipstick Shades: लिपस्टिक ही प्रत्येक तरुणीच्या मेकअपमधील महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य शेड निवडल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो, पण चुकीची निवड संपूर्ण सौंदर्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे आपल्या स्किन टोनला साजेशा शेड्स जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लिपस्टिक (Lipstick) हा प्रत्येक तरूणीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कुठेही बाहेर फिरायला जाताना, एखाद्या कार्यक्रमाला जाताना तरूणी बाकी मेकअप (Makeup) करायचं विसरतील पण लिपस्टिक लावायचं कधीच विसरत नाहीत. कारण लिपस्टिक लावल्यामुळे तरूणींचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. त्यामुळे तरूणी त्यांच्या स्कीन टोनला सूट होईल अशी लिपस्टिक नेहमी लावत असतात. पण चुकीची लिपस्टिक निवडल्यास चेहरा कमी सुंदर दिसू शकतो. त्यामुळे बऱ्याच तरूणी स्किन टोनला कोणती लिपस्टिक शेड सर्वात चांगली शोभेल, याबाबत गोंधळात पडतात. तसेच तुम्ही देखील लिपस्टिकच्या शेडवरून (Lipstick Shade) गोंधळात पडता का? तसं जर असेल तर आता आपण अशा काही बेस्ट लिपस्टिक शेड्सबाबत जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या रंगाला शोभून दिसू शकतात आणि तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसू शकते.

हेही वाचा – उन्हाळ्यात सनस्क्रीन खरेदी करताय? तर खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

सर्व स्किन टोनसाठी कोणत्या लिपस्टिक शेड्स आहेत बेस्ट?

प्लम किंवा बेरी शेड्स

प्लम जांभळ्या रंगाची लिपस्टिक शेड अनेक प्रकारच्या त्वचेच्या रंगांसाठी एक चांगला पर्याय असू शकते. गडद बेरी शेड्समुळे एक आकर्षक लूक मिळतो. जर तुम्ही बोल्ड लूकच्या शोधात असाल, तर ही लिपस्टिक शेड नक्की वापरून पहा. पारंपरिक किंवा आधुनिक लूकसाठी, क्लासिक लाल लिपस्टिक शेड किंवा विटकरी लाल रंगाची लिपस्टिक शेड वापरून पहा.

न्यूड ब्राऊन किंवा कॉफी शेड्स

न्यूड ब्राऊन किंवा कॉफी शेड्स ही सर्व स्किन टोनसाठी सर्वात नैसर्गिक दिसते. तुम्ही लिपस्टिकची ही शेड देखील वापरून पाहू शकता. चॉकलेट ब्राऊन लिपस्टिक शेड प्रत्येक त्वचेच्या रंगाला शोभून दिसते. याव्यतिरिक्त, वॉर्म न्यूड लिपस्टिक शेड्स देखील प्रत्येकासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. तुम्ही यापैकी कोणतीही शेड वापरून पाहू शकता.

वॉर्म पिंक किंवा रोझ पिंक शेड्स

जर तुम्हाला गडद रंगाची लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर तुम्ही वॉर्म पिंक किंवा रोझ पिंक शेड्स वापरून पाहू शकता. जर तुम्हाला खूप फिकट गुलाबी रंग आवडत नसेल, तर तुम्ही मॅजेंटा रंगदेखील वापरून पाहू शकता. रोझ पिंक लिपस्टिक शेड्स प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या रंगाला शोभून दिसतात. लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्समुळे वेगवेगळे लूक्स तयार करता येतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts