Manya Anand allegations : तामिळ अभिनेत्री मान्या आनंदने एका मुलाखतीत तिच्यावर अभिनेता धनुषच्या मॅनेजरने कास्टिंग काऊचच्या माध्यमातून तिचे शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लागवण्यात आला आहे. तिने धनुष्य च्या मॅनेजरवर बरेच आरोप प्रत्यारोप लगावत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
तामिळ सिनेसृष्टीतील टेलिव्हिजन अभिनेत्री मान्या आनंदने अलीकडेच एका मुलाखतीत धनुषच्या मॅनेजरवर गंभीर आरोप लगावले आहेत. ती म्हणते कि, धनुषचा मॅनेजर श्रेयसने तिचे कास्टिंग काऊचच्या माध्यमातून शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्याशी एका नवीन चित्रपटाची माहिती देण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिने काही दिवसांपूर्वी सिनेलुगम ने घेतलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला.
काय होता त्यांच्यातील संवाद
हि एक कमिटमेंट आहे, म्हणजे व्यावसायिक मर्यादांपलीकडील अपेक्षित असल्याचा सांगितले होते. असे मान्या म्हणते. यावर तिने पुन्हा प्रश्न विचारला, कशाची कमिटमेंट ? मी का कमिटमेंट द्यावी ? आणि तिने याला नकार दिल्याचे स्पष्ट केले. यावर श्रेयसने प्रतिक्रिया दिली कि, धनुष्य सर असले तरीही तू तयार होणार नाही का ? यावर देखील तिने नकार दिल्यानंतर श्रेयसने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय धनुष्य प्रोडक्शन हाऊस Wunderbar film चे लोकेशन डिटेल्स आणि प्रोजेक्टची स्क्रिफ्टदेखील तिला पाठवण्यात आल्याचे तिने सांगितले.
लोकांनी हा पॅटर्न ओळखून तो सोडवायला पाहिजे
मी हा चित्रपट करणार नसुन, आम्ही कलाकार आहे, आम्ही वेगवेगळे कलाकार आहोत, आम्ही वेगवेगळे काम करतो, तुम्ही आमच्याकडून काम करून घ्या परंतु त्या बदल्यात दुसरी कोणतीही अपेक्षा करू नका. जर तुमच्या मागण्या मान्य केल्या तर आमचे नाव वेगळे असेल. मला वाटते, लोकांनी हा पॅटर्न ओळखून तो सोडवायला पाहिजे. असे देखील मान्या आनंद म्हणाली.
मान्या आनंद ने तामिळ चित्रपटसृष्टीत वारंवार येणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधले असून व्यावसायिक संधीच्या नावाखाली कलाकारांना जबरदस्तीने किंवा तडजोड करण्याची परिस्थिती त्यांच्यावर आणू नये असे स्पष्ट मत व्यक्त केले.
कोण आहे मान्या आनंद
मान्या आनंद या तामिळ अभिनेत्रीला तामिळ चित्रपटसृष्टीत तिच्या कामासाठी, खासकरून लोकप्रिय मालिका ‘वनथाई पोला’ मधील तिच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. तिने तिच्या व्यासपीठाचा वापर करून उद्योगातील गैरव्यवहारांबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. अभिनेत्रींना करिअरच्या संधी शोधताना येणाऱ्या आव्हानांवर तिने प्रकाश टाकला असून तिचा अनुभव शेअर करून, तिने तिच्यावर होणाऱ्या शोषणावर आवाज उठवला आहे. जो कि, सर्वांनी उठवण्याची गरज आहे.












