Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा अनपेक्षित सूर; शरद पवारांचं केलं कौतुक, म्हणाले, “त्यांनी सर्वसामान्यांना…”
Mumbai

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा अनपेक्षित सूर; शरद पवारांचं केलं कौतुक, म्हणाले, “त्यांनी सर्वसामान्यांना…”

Raj Thackeray On Sharad Pawar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काल (19 मार्च) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) गुढी पाडवा मेळावा (MNS Padwa Melava) पार पडला. राज ठाकरेंच्या या मेळाव्याला संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. तर या मेळाव्यात भाषणादरम्यान राज ठाकरेंचा अनपेक्षित सूर सर्वांना दिसून आला. आत्तापर्यंतच्या अनेक भाषणांमध्ये किंवा पत्रकार परिषदांमध्ये राज ठाकरेंनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. मात्र, यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांवर कसलीही टीका न करता त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा –  ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठणावर बंदी; मुस्लिम देशाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

राज ठाकरेंनी महान व्यक्तींच्या नावाच्या यादीत शरद पवारांच्या नावाचा केला उल्लेख

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शरद पवारांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच बारामतीच्या विकासाबाबतही त्यांनी भाष्य केलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या भाषणात महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तींच्या नावाच्या यादीत शरद पवारांच्या नावाचा समावेश केला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सर्व संत आणि थोर समाजसुधारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक नावांच्या यादीत राज ठाकरेंनी शरद पवारांचे नाव घेतले.

शरद पवारांबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

शरद पवारांचं कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले की, आपण रस्त्यावर अनेक प्रकारची फळे पाहतो. ही फळे पूर्वी आपल्याला पाहायला देखील मिळत नव्हती. पण, आज ती फळे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. शरद पवारांनी राज्यात फलोत्पादन क्षेत्रात सर्वात मोठी क्रांती केली आहे, त्यामुळेच आज आपल्याला महाराष्ट्रात जी फळे दिसत नव्हती ती मिळायला लागली आहेत. जरी राजकीय मतभेद असले तरी या शरद पवारांच्या या कार्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बारामतीचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी बारामतीमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यांनी बारामतीच्या शेती क्षेत्रात एआय (AI) अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणून मोठी क्रांती केली आहे. शरद पवारांनी हे तंत्रज्ञान आणल्यामुळे बारामतीमधील शेतीचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे सर्वांनी बारामतीला एकदा जाऊन हे प्रयोग नक्की बघावेत, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.

तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती कशाप्रकारे आधुनिक करता येते, याचे उत्तम उदाहरण शरद पवारांनी सेट केले असल्याचेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. अशाप्रकारे राज ठाकरेंनी शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांचं कौतुक केल्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts