Railway Recruitment : तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये (Railway Recruitment) नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर ही महत्वाची बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता ‘ग्रुप डी’ पदांसाठी (‘Group D’ post) तब्बल 22 हजाराहून अधिक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अनेक तरुण १२ वी शिक्षण झाल्यावर नोकरीच्या शोधात असतात. काही शिक्षण शिकत नोकरी करतात तर काही परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता आरआरबीने ग्रुप डी मध्ये २२,१९५ पदांसाठी भरती जाहीर (Recruitment announcement) केली आहे आणि त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च निश्चित करण्यात आली होती, परंतु ती ९ मार्चपर्यंत वाढविण्यात (Date Extension) आली आहे. ज्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अदयाप देखील अर्ज भरलेला नाही त्यांनी अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महायुती सरकारचा मोठा प्लॅन, लवकरच करणार मोठी घोषणा
पदांची माहिती
या भरती अंतर्गत, देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण २२,१९५ पदे भरली जातील.
पश्चिम रेल्वे, मुंबई – ३,१४८ पदे
उत्तर रेल्वे, नवी दिल्ली – ३,५३७ पदे
मध्य रेल्वे, मुंबई – १,९७९ पदे
दक्षिण रेल्वे, चेन्नई – १,०३६ पदे
उत्तर पूर्व रेल्वे, गोरखपूर – १,२४६ पदे
ईशान्य फ्रंटियर रेल्वे, गुवाहाटी – १,७७६ पदे
याशिवाय, इतर झोनमध्येच मोठ्या संख्येने पदे उपलब्ध आहेत. म्हणजेच देशभरातील विविध क्षेत्रात नोकरी मिळवण्याची संधी आहे.
या पदासाठी पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १०वी उत्तीर्ण तरुण या संधी लाभ घेऊ शकतात. उमेदवारीची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे आहे. वयोमर्यादा १ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर मोजली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार जास्तीत जास्त वयात सूट दिली जाईल.
एकूण शुल्क किती?
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणी उमेदवारांना ५०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे. तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क आहे.
अर्ज कसा करावा?
याभरती प्रक्रियेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जावे. तेथे तुमच्या आधार कार्डच्या आधारे नोंदणी करा. त्यानंतर लाॅग-इन करून अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. कागदपत्रे अपलोड करा आणि तुमच्या श्रेणीनुसार शुल्क जमा करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंट आउट घ्या.










