Rupali Chakankar Viral Photo Truth: राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत गेली २-३ दिवशी व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे अनामिका बोट कापल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या दाव्यांवर त्यांनी स्पष्टीकरण देत फोटोमागचं सत्य समोर आणलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि आरोपांवर स्पष्ट भूमिका मंडळी आहे. सप्टेंबरमधील एका फोटोच्या आधारे चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा त्यांनी आरोप केला असून, अशा अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, “दोन दिवसांपासून चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत, महिला असल्यामुळे मला मुद्दाम “सॉफ्ट टार्गेट” केलं जातं आहे. २ सप्टेंबरचा फोटो दाखवून खोटा कथानक तयार केलं जात आहे, जे पूर्णपणे चुकीचं आहे.
हेही वाचा:
भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) यांच्याशी संबंधित वादामुळे चाकणकर अडचणीत आल्या होत्या. खरातवर बलात्काराचे गंभीर आरोप असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चाकणकर यांचे त्याच्यासोबतचे काही जुने फोटो समोर आले होते, ज्यामध्ये त्या त्याच्या पाद्यपूजेत सहभागी झालेल्या दिसत होत्या. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
अध्यक्षपदाचा राजीनामा
यानंतर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि माध्यमांसमोर येत त्यांनी आपली बाजू मांडली. (Resignation from the post of Chairperson of the State Women’s Commission) त्यांनी हे देखील सांगितलं की, “हे फोटो सुमारे पाच वर्षांपूर्वीचे आहेत. त्या वेळी एखादा व्यक्ती पुढे काय करेल, हे कुणालाच माहीत नसतं. आमचं कुटुंब वारकरी परंपरेशी जोडलेलं असल्यामुळे आम्ही त्या ट्रस्टशी संबंधित होतो, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती.”
दरम्यान, अनेक तपासात असेही समोर आले आहे की, अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे यांचा आरोप
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप करत त्यांना अटक करण्याची आणि नार्को चाचणी करण्याची मागणी केली होती. त्यांनी असा दावा केला की, चाकणकर यांनी वशीकरण विद्या शिकण्यासाठी २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापली.
चाकणकर यांचे स्पष्टीकर
या आरोपांवर उत्तर देताना चाकणकर म्हणाल्या, “अनामिका कापल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. दाखवला जाणारा फोटो २ सप्टेंबरचा नसून १२ सप्टेंबरचा आहे. २ सप्टेंबरला मी अजित पवार यांच्या दौऱ्यात होते आणि माझ्या हाताला कोणतीही जखम नव्हती. सातत्याने चुकीची माहिती पसरवली जात आहे.” त्यांनी शेवटी स्पष्ट केलं की, “खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. पुरावेसह मी पत्रकार परिषद लवकर घेईन.












