Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अंधश्रद्धेचा गैरफायदा! ‘अप्सरा’ असल्याचं सांगत खरातनं महिलेवर केला अत्याचार, आणखी एका महिलेचा धक्कादायक खुलासा
Top News

अंधश्रद्धेचा गैरफायदा! ‘अप्सरा’ असल्याचं सांगत खरातनं महिलेवर केला अत्याचार, आणखी एका महिलेचा धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Case | अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळ्या कारनाम्यांमुळे नाशिकसह (Nashik) संपूर्ण राज्य हादरले आहे. प्रसिद्ध ज्यातिषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातने अनेक महिलांच्या अंधश्रेद्धाचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलांचे शोषण केल्याचे एकामागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आताही एका महिलेने अशोक खरातविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा – हवामान खात्याचा रेड अलर्ट; 5 जिल्ह्यांवर पावसाचं संकट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

मागील जन्मी अप्सरा असल्याचं सांगत खरातचं महिलेसोबत अमानुष कृत्य

कौटुंबिक वादाने त्रस्त असलेल्या एका विवाहित महिलेने अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यावेळी पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत धक्कादायक खुलासा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावात होती. त्यामुळे ती हे वाद संपावे आणि सगळं चांगलं व्हावं म्हणून अशोक खरातकडे गेली. मग तिच्या मानसिकतेचा फायदा खरातने घेण्यास सुरूवात केली. “तू मागील जन्मी अप्सरा होतीस आणि तुझा घटस्फोट होणार आहे, हे आधीच निश्चित आहे”, असं सांगत खरातने पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने धार्मिक विधी, भविष्यातील संकाटाची भीती घालून त्या महिलेवर वारंवार अत्याचार केला.

पीडित महिलेला दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या

या अत्याचारादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली. त्यानंतर खरातने पीडित महिलेला आपल्या कार्यालयात बोलावले आणि तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्याने फक्त तिचे शारीरिक शोषणच केले नाही तर मानसिक शोषण देखील केले आणि तिची फसवणूक केली. तसेच माझ्या नशिबात दोन लग्न आहेत आणि तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या मुलांना सुखी ठेवीन, असं खोटं आश्वासन देखील खरातनं दिल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

पीडित महिलेच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे. खरातच्या या अमानुष कृत्यामुळे नाशिक परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकामागून एक नवीन गुन्हे दाखल होत असल्यामुळे या प्रकरणात खरातने नेमकी किती महिलांची फसवणूक केली? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकल्यानंतर त्यांना 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts