• Home
  • महाराष्ट्र
  • अशोक खरातच्या पत्नीने मारली पलटी, सगळं नवऱ्यावर ढकलून झाली रिकामी, कोर्टात दिली धक्कादायक कबुली
Top News

अशोक खरातच्या पत्नीने मारली पलटी, सगळं नवऱ्यावर ढकलून झाली रिकामी, कोर्टात दिली धक्कादायक कबुली

kharat 13

Kalpana Kharat Confession In Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत. तर आताही खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण खरातची पत्नी कल्पना खरातने (Kalpana Kharat) कोर्टात धक्कादायक कबुली दिली आहे. तिने सर्व आरोप नवऱ्यावर ढकलले असून स्वत:ला या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – केईएम हॉस्पिटलला नवं नाव देणार? मंगलप्रभात लोढा यांचा पालिकेकडे प्रस्ताव

31 मार्च रोजी अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे. सध्या नाशिक पोलीस फरार कल्पना खरातचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत. मात्र, अद्यापही तिचा कुठेच थांगपत्ता लागलेला नाहीये. जरी कल्पना खरात फरार असली तरी तिने स्वत:च्या बचावासाठी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तर या अर्जावर आज कोर्टात सुनावणी पार पडली.

कल्पना खरातने अशोक खरातवर केले आरोप

आज कल्पना खरातने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात कल्पना खरातच्या बाजूने वकील प्रशांत गिरी हे उपस्थि होते. तर त्यांनी कल्पना खरातची भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळले आहेत. वकील प्रशांत गिरी यांनी सांगितलं की, पती अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत मला कोणतीही माहिती नाही. माझ्या पतीने गंभीर गुन्हे केले आहेत, अशी कल्पना खरातची भूमिका वकील प्रशांत गिरी यांनी कोर्टात मांडली.

कल्पना खरातने कोर्टात काय दिली कबुली?

अशोक खरातच्या अनेक गुन्ह्यांमध्ये कल्पना खरातचा सहभाग होता. ती खरातला साथ देत होती आणि तिच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले आहेत. तसेच तिच्या नावावर खरातची संपत्ती देखील आहे, असा आरोप कल्पना खरातवर करण्यात आला होता. यावर वकील प्रशांत गिरी यांनी कल्पना खरातची बाजू मांडली. ते म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात कल्पना खरातचा सहभाग नव्हता. तसेच कल्पना खरातची सर्व बँक खाती अशोक खरात ऑपरेट करत होता, असा युक्तीवाद वकिलांनी केला आहे. तर वकिलांचा हा युक्तीवाद कोर्टाने ऐकला असून यावर सायंकाळी पाच वाजता कोर्ट निर्णय देणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts