Shahrukh Khan birthday : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आज २ नोव्हेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी प्रेक्षक त्याच्या आगामी “किंग” चित्रपटाच्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली. “किंग” चित्रपटाचे शीर्षक जाहीर झाले आहे. शाहरुखने त्यांच्या ‘एक्स’ या सोशल मिडिया अकाउंटवर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. शाहरुख पुन्हा एकदा त्याच्या अॅक्शनने प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हे ही वाचा – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर मर्डर ? बहिणीचा खुलासा, रिया चक्रवतीच्या त्या पोस्ट वर साधला निशाणा
फराह खानने शाहरुखला केल ‘किस’
फराह खानने शाहरुख सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे फोटो शाहरुखच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे आहेत. कॅप्शनमध्ये फराहने लिहिले आहे, “वाढदिवसाच्या शुभेच्छा राजा! पुढील १०० वर्षे तुम्ही राज्य करा.” एका फोटोमध्ये फराह शाहरुखला किस करते. या फोटोंमध्ये भिंतीवर सुहाना आणि आर्यनचे फोटो पार्श्वभूमीत दिसतात.
View this post on Instagram
मला आठवत नाही मी किती खून केले!
शाहरुख खानच्या खास दिवशी, रेड चिलीजच्या यूट्यूब चॅनेलवरून एक व्हिडिओ शेअर करून ‘किंग’ ही पदवी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. व्हिडिओची सुरुवात समुद्राच्या दृश्याने होते. पार्श्वभूमीवर किंग खानचा आवाज ऐकू येतो, “मला आठवत नाही मी किती खून केले. मी कधीही विचारले नाही की ते चांगले लोक होते की वाईट. मी फक्त त्यांच्या डोळ्यात हे जाणवले की हा त्यांचा शेवटचा श्वास होता. आणि मी त्याचे कारण आहे. शंभर देशांमध्ये कुप्रसिद्ध हजारो गुन्हे. जगाने मला फक्त एकच नाव दिले आहे. ‘किंग’. मी घाबरत नाही, मी दहशतवादी आहे. आता शोची वेळ आली आहे.”
Sau deshon mein badnaam,
Duniya ne diya sirf ek hi naam – #KING#KingTitleReveal
It’s Showtime!
In Cinemas 2026. pic.twitter.com/l3FLrUH1S0— Shah Rukh Khan (@iamsrk) November 2, 2025
शाहरुख खानचं भयंकर रुप
शाहरुख खानची भयंकर रुप संपूर्ण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. तो गोळ्या झाडताना आणि भयंकार मोठ्या लढाईत सहभागी होताना दिसत आहे. शेवटचा दृश्य खरोखरच भयानक आहे, कारण तो एकाच प्रहारात एका माणसाचा दात तोडतो. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “शंभर देशांमध्ये कुप्रसिद्ध. जगाने त्याला फक्त एकच नाव दिले आहे: किंग.” हा चित्रपट पुढील वर्षी, २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.












