Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राजकीय घडामोडींना वेग! काल मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार, आज शिंदे अचानक शहांच्या भेटीला
Top News

राजकीय घडामोडींना वेग! काल मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार, आज शिंदे अचानक शहांच्या भेटीला

Eknath Shinde-Amit Shah

Eknath Shinde meets Amit Shah :राज्याच्या राजकारणातील मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला दिल्लीला गेले आहेत. महायुतीतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. शिंदे-शहा यांच्या बैठकीत काही तोडगा निघतो का हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप करत शिंदेंच्या मंत्र्‍यांना मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर नाराज मंत्र्यांनी खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. मात्र, यावेळी कोणताही तोडगा निघाला नसल्याने शिंदे याच दिल्लीला गेल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मोठा झटका! ४५ वर्षे शिवसेनेला साथ दिलेला, एकनिष्ठ शिलेदार शिंदेंनी फोटला

काल दिवसभरात काय घडामोडी घडल्या..

राज्यातील एकूण परिस्थिती पाहाता सत्ताधारी महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, या वादाचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली होती. या शक्तिप्रदर्शननंतर लगेचच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीतील आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट 

नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली असली, तरी शिंदे गटाचे समाधान झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, फडणवीस यांच्या भेटीनंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजेच आज, एकनाथ शिंदे थेट दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. फोडाफोडीच्या राजकारणावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीतील जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावावर या दोन नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा होणार आहे. या दिल्लीवारीमुळे महायुतीतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

एकनाथ शिंदे बिहारला जाणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेऊन राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वादावर चर्चा केली. दिल्लीतील भेटीगाठी संपल्यानंतर शिंदे यांच्या बिहार येथील मुख्यमंत्री शपथविधीला हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts