Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका! लग्न सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला..
Top News

स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका! लग्न सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला..

Ambulance carrying Smriti Mandhana and the patient

Smruti Mandhana relative heart attack  : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार तथा सांगलीची कन्या स्मृती मंधानाचा विवाह सोहळा आज पार पडणार होता. मात्र, तिच्या वडिलांना लग्नाच्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला. यामुळे लग्न सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सांगलीमध्ये पार पडणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी मंधाना परिवाराकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. सांगलीच्या समडोळी रोडवरील मंधाना फार्म हाऊसवर स्मृती व पलाश यांचा विवाह सोहळा पार पडणार होता मात्र, मध्येच विघ्न आल्याने आता हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये लक्ष्य सेनचा जलवा; जपानच्या खेळाडूचा पराभव करत जिंकली स्पर्धा

लग्नाची तयारी सुरु असताना आला हर्ट अटॅक

वास्तविक सांगलीच्या समडोळी रोडवरील मंधाना फार्म हाऊसवर स्मृती व पलाश यांचा विवाह सोहळ्याची तयारी सुरु असताना स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर संबंधित तिच्या वडिलांना तात्काळ सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी करण्यात दाखल आलं. तसंच रुग्णालयामध्ये स्मृती मंधाना व कुटुंबीयही दाखल झाले आहेत. या घटनेमुळं लग्न स्थळाच्या ठिकाणावरुन येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात असून लग्न स्थळाच्या ठिकाणी डेकोरेशन काढण्याचंही काम सुरु असल्याचं सांगितलं जातंय.

कसा स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका ?

श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्मृतीचे जवळचे मित्र तोहीन मिश्रा यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधता आहे. आज सकाळी नास्ता करताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली होती आम्हाला वाटलं बरी होईल. यामुळे आम्ही थोडावेळ थांबतो. त्यानंतर त्यांची तब्येत अधिक बिघडली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे. स्मृतीचा वडीलांवर जीव आहे त्यामुळे तिने जोपर्यंत वडील बरे होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही असे ठरवले आहे, अशी माहिती वोहीन मिश्रा यांनी दिली.

अनिक्षित काळासाठी लग्न पुढे ढकलले..

डाॅक्टरांनी स्मृतीच्या वडिलांची तब्येत लवकरच ठीक होणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न पुढे ठकलं आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे, असे मानधना हिचा जवळचा मित्र तोहीन याने सांगितलं.

डाॅक्टरांनी मानधनाच्या वडिलांची तब्येत ठिक होणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न पुढे ढकललं आहे. अनिक्षित काळासाठी लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे, असे सांगताना मानधनाची प्रायव्हसी जपा, असे आवाहन मिश्रा यांनी केलं आहे.

आज सायंकाळचा होता मुहूर्त

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाचा विवाह संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत आज होणार आहे. यांच्या लग्नासाठी आज सायंकाळी साडेचार वाजताचा मुहूर्त होताय मात्र आता ही घटना घडल्यानं लग्न होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यासाठी क्रीडा व विविध क्षेत्रातले दिग्गज आपली उपस्थिती लावणार होते.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts