Lakshya Sen : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेननं ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन 2025 चं विजेतेपद जिंकलं आहे. त्यानं अंतिम सामन्यात जपानचा दिग्गज बॅडमिंटनपटू युशी तनाकाचा पराभव केला. सेननं या अंतिम सामन्यात सरळ सेटमध्ये (21-15, 21-11) जेतेपद जिंकलं. यासह सेननं त्याचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. लक्ष्यचं या हंगामातील हे पहिलं जेतेपद आहे. यासह, सेन या हंगामात BWF जेतेपद जिंकणारा फक्त दुसरा भारतीय ठरला.
अंतिम फेरीत चमकला लक्ष्य सेन
ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेच्या अंतिम फेरीत, 13व्या मानांकित लक्ष्य सेनचा सामना जपानच्या 27व्या मानांकित युशी तनाकाशी झाला. लक्ष्यच्या तुलनेत तनाका फिका दिसत होता. लक्ष्यनं पहिला सेट 21-15 असा जबरदस्त जिंकला आणि नंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. दुसरा सेट 21-11 असं जिंकून जेतेपद पटकावलं. यासह, लक्ष्य सेननं 2025 मधील त्याचं पहिलं विजेतेपद जिंकलं आहे.
हेही वाचा – गुवाहाटी कसोटीत पहिल्या दिवशी आफ्रिकेच्या 247 धावा; कुलदिपनं घेतल्या 3 विकेट
सामन्यात सुरुवातीपासून वर्चस्व
लक्ष्यनं सामन्याच्या सुरुवातीपासूनच तनाकावर वर्चस्व गाजवलं. त्यानं आपला चपळ खेळ दाखवला आणि पहिला सेट उत्कृष्टपणे घेतला. अंतिम फेरीत विजयाच्या दिशेनं एक पाऊल टाकत लक्ष्यनं 21-15 असा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही त्याचं कौशल्य दिसून आले. या सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्य सेननं सुरुवातीपासूनच तनाकावर वर्चस्व गाजवलं. लक्ष्यनं नेहमीच सेटवर वर्चस्व गाजवले आणि त्याच्या उत्कृष्ट खेळाने त्यानं आपली आघाडी कायम ठेवली. सामन्यादरम्यान त्यानं अनेक वेळा सर्व्हिस गमावली परंतु शानदार पुनरागमन केलं आणि शेवटी 21-11 असा सेट जिंकला.












