Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवारांच्या जीवाला मोठा धोका? निनावी पत्राने वाढला तणाव; पत्रात नेमकं काय लिहिलं?
Top News

सुनेत्रा पवारांच्या जीवाला मोठा धोका? निनावी पत्राने वाढला तणाव; पत्रात नेमकं काय लिहिलं?

Sunetra Pawar | नुकतीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. एका निनावी पत्रातून हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या पत्रात भोंदूबाबा अशोक खरातच्या हस्तक आणि बीड जिल्हाध्यक्ष प्रज्ञा खोसरे यांच्यापासून सुनेत्रा पवारांना धोका असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर या पत्राबाबत प्रज्ञा खोसरे यांनी आक्रमक होत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा – युद्ध थांबताच सोन्याची मोठी झेप! एका झटक्यात इतक्या रुपयांनी झाली वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर

नेमंक काय लिहिलं आहे पत्रात?

एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात प्रज्ञा खोसरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, प्रज्ञा खोसरे या भोंदू अशोक खराच्या प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. त्या खरातकडे महिलांना नेण्याचं काम करतात. तर खोसरे यांनी स्वत: 4 ते 5 वेळा गर्भलिंग निदान करून गर्भपात केला आहे. त्यांनी स्वत:च्या भावाच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला होता. याबाबत 2009 मध्ये बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बीड जिल्ह्यातील इतर ज्या महिला आहेत त्यांना पुत्रप्राप्तीसाठी विविध डॉक्टरांकडे नेल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

भोंदू अशोक खरातच्या हस्तक म्हणून प्रज्ञा खोसरे काम करतात. त्यांनी रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून चुकीची माहिती देत बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद मिळवले होते. तर त्यांच्या या वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे राज्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला मोठा धोका आहे, असं या पत्रात लिहिलं आहे. या पत्राने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

या पत्रात करण्यात आलेल्या आरोपांनंतर प्रज्ञा खोसरे यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, निनावी पत्र व्हायरल करून माझी बदनामी केली जात आहे. याबाबत कुठलाही ठोस असा पुरावा नाहीये. अजितदादा गेल्यानंतर आम्ही सुनेत्रा वहिनींना आमचे सर्वस्व मानतो. आम्ही पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार ग्राऊंड लेव्हलवर काम करत आहोत. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करणं हास्यास्पद आहे. हे निनावी पत्र ज्यांनी कोणी लिहिले आहे त्यांच्या विरोधात मी लवकरच मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा प्रज्ञा खोसरेंनी दिला आहे.

ढोंगी अशोक खरातचा मी निषेध करते आणि त्याला कडक शिक्षा करायला पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे, असंही प्रज्ञा खोसरे यांनी म्हटलं आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts