Tamhini Ghat Thar accident : पुणे-माणगाव महामार्गावर ताम्हिणी घाटामध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. थार गाडी ५०० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर गाडीत आणखीन दोन जण होते, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून प्रवाशांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर थार गाडी ५०० फूट खोल तरीत कोसळली. हा अपघात सोमवारी रात्री झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात झाल्याचं तीन दिवसांनी समोर आलं आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. या गाडीत आणखीन दोन जण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – बिश्नोईचा भाऊ अनमोल भारतात दाखल; बाबा सिद्दीकी हत्यांकांडाचा लवकरच होणार उलगडा?
गाडीतील सर्व तरुण पुण्यातील रहिवासी
गाडीतील सर्व तरुण पुण्यातील रहिवासी आहेत. सोमवारी पुण्यावरून माणगावकडे पर्यटनासाठी निघालेल्या या तरूणांचा मंगळवारी दिवसभर संपर्क होत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांनी पुणे आणि माणगाव पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली होती. पुण्यातील खडकवासला–उत्तम नगर येथील सहा पर्यटक मध्यरात्री कोकण पर्यटनासाठी सोमवारी रात्री निघाले होते, त्यावेळी हा अपघात घडल्याचं म्हटलं जात आहे.
कठडा तुठल्याचे कळल्यानंतर अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले
या तरुणाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात आढळल्याने ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या तरुणांचा शोध घेण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली. घटनास्थळी माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली उतरून तरुणांचा शोध सुरू केला. ताम्हिणी घाटात ही थार गाडी दरीत कोसळल्याचा कोणालाही पत्ता नव्हता. कठडा तुठल्याचे कळल्यानंतर येथे अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले. या थार कारचा नोंदणी क्रमांक एमएच 14 एचडब्यू 7575 असा आहे. रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर यात ४ तरुणांचा मृ्त्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व मृत झालेले तरुण हे 22 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.








