Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • उलटी गिनती शुरू? ठाकरेंनी डाव टाकला, भाजपचा मोठा नेता गळाला लावला
Top News

उलटी गिनती शुरू? ठाकरेंनी डाव टाकला, भाजपचा मोठा नेता गळाला लावला

Shivsena (UBT) join Suresh Bhoi

शिवसेना फुटीपासून आजतागत पक्षाला लागलेली फुटीची गळता काही केल्या थांबायचे नाव घेत नव्हती. प्रत्येक दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेतून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध पक्षात प्रवेश घेतल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता उलटी गिनती शुरू झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत ठाकरेंनी भाजपला जोराचा झटका दिला आहे. ठाकरेंनी एक डाव टाकला अन् भाजपचा गळाला लागला. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेतील आउटगोइंग बंद झाली असून इनकमिंग सुरू झाली का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीत प्रवेश केल्याचे दिसून आले. मात्र आता उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा दणका दिला असून कल्याण डोंबिवलीतील एका माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपचे नाराज माजी नगरसेवक सुरेश भोईर शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे.

हेही वाचा – शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे पदाधिकारी यांच्यात झाला राडा; वातावरण तापले

सुरेश भोईर यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

कल्याण टिटवाळा परिसरातील भाजपचे निष्ठावंत माजी नगरसेवक सुरेश भोईर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुरेश भोईर यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने सुरेश भोईर हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर ठाकरे गटाची ताकद वाढला आहे.

तिकीट मिळणार नाही या भीतीने त्यांनी पक्षांतर केले – नरेंद्र पवार

सुरेश भोईर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटले की, ‘माजी नगरसेवक सुरेश भोईर यांचा प्रभाग मध्ये आरक्षण पडलेला आहे. ते त्यांच्या मुलासाठी तिकीट मागत होते. त्यांना तिकीट मिळणार नाही याबाबत शंका होती. या भीतीने उद्धव ठाकरे पक्षात ते गेले. ज्यांना संभ्रम आहे ते आमच्याशी थेट बोलतात आणि आमच्याशी बोलणं झाल्यावर त्यांना खात्री पटल्याने ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारही करत नाही.

गैरसमज दूर झाला असता तर ते गेले नसते

पुढे बोलताना नरेंद्र पवार म्हणाले की, ‘सुरेश भोईर यांनी चर्चा केली असती तर त्यांना देखील आम्ही क्लियर केलं असतं. आरक्षणामुळे त्या ठिकाणी अडचण असून ज्येष्ठ आणि माजी नगरसेवक असल्याने त्यांचं चांगलं काम आहे, मात्र त्यांनी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. त्यांनी राजीनामा दिला तेव्हा जिल्हाध्यक्ष निवडणूक प्रमुख, प्रदेशाध्यक्ष यांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांचा जो गैरसमज होता तो दूर झाला असता तर ते गेले नसते.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts