• Home
  • राजकारण
  • शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे पदाधिकारी यांच्यात झाला राडा; वातावरण तापले
Top News

शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे पदाधिकारी यांच्यात झाला राडा; वातावरण तापले

Graphic showing two political leaders facing each other with a “VS” symbol in the center, representing a political clash or rivalry

Political Fight Between ShivSena Shinde Group and BJP : एकीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लागभग सुरू असल्याचे दिसत आहे. नगरसेवक होण्यासाठी बरेच नेते आता प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले असताना राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात नारंजीनाट्य पाहायला मिळत आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटात आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काल 20 नोव्हेंबर रोजी भाजपचे माजी नगरसेवक यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासह पोलिसानी एनसी दाखल केली आहे.

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांवर पुढील महिन्यापासून होणार कारवाई

तक्रार दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखा प्रमुख आणि महेश लहाने, उपविभागप्रमुख यांना भाजपचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप  शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून लगावण्यात आला आहे. त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण

शिवसेना शिंदे गटाकडून काल बीएसयूपी घरांसाठी 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली होती. हे सर्व एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी बीएसयूपी  इमारतीत जाऊन सेलिब्रेशन केले होते. परंतु  भाजपच्या माजी नगरसेवकाने कसले सेलिब्रेशन करत आहात हे विचारले. अन या पदाधिकारी यांनी त्यांना मारहाण केली. असा आरोप लगावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी आता वाद चिघळण्याचे चिन्हे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts