• Home
  • राजकारण
  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांवर पुढील महिन्यापासून होणार कारवाई
Top News

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांवर पुढील महिन्यापासून होणार कारवाई

Two rural women smiling while checking scheme benefits on a mobile phone under the Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana Action : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राजे सरकारने महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू केली होती. ही योजना सरकारने गरीब होतकरू महिला वर्गासाठी सुरू केली होती. परंतु बऱ्याचगव्हरमेन्ट जॉबला असणाऱ्या महिलानी देखील खोटे कागदपत्र जमा करत नियमांचे उल्लंघन करत या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु आता लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उचलणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजना राबावल्या नंतर बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यानी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. आता ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण फायदा उचलला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. एवढेच नाही तर त्यांनी घेतलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील  वसूल केले जाणार आहे, याशिवाय आता  वेतनवाढ देखील  रोखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा : भाजपचा ‘बिनविरोध’ पॅटर्न! शिवसेनेला धक्का देत, महाजनांच्या पत्नीचा विजय

महिला बाल विकास विभागाकडून  कारवाई

या योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी महिलांच्या kyc करण्याचा प्रश्न समोर आल्या नंतर बऱ्याच  बाबी समोर आल्या होत्या. यामध्ये 5000 सरकारी कर्मचारी तर 3000   शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व अधिकारी आणि महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई करण्यात येणार आहे.

शिस्तभंगाची कारवाई होणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या सरकारी कर्मचाऱ्यानी लाभ घेतला आहे. त्यांची आता छाननी केली जात आहे. त्यानुषंगाने  पुढील महिन्यापर्यंत लाभ घेतलेले कर्मचारी कोणत्या विभागातील आहे याची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर त्या  विभागांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात येईल. त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जातीलच शिवाय त्यांची पगारवाढही रोखण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. आतापर्यंत अडीच कोटी महिलांपैकी 1  कोटी 30  लाख महिलांची आतापर्यंत ई केवायसी पूर्ण झाली आहे.

 

1 कोटी लाभार्थी महिलांची ईकेवायसी अपूर्णच

 

राज्यातील लाडकी बहीण योजेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी महिलांपैकी 1 कोटी 30 लाख महिलांचे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर 1 कोटीपेक्षा जास्त महिलांचे ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसीची तारीख वाढवून दिली आहे. त्यानुषंगाने आता ही तारीख 31 डिसेंबर करण्यात आली आहे. तरी लाभयार्थ्यानी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. परंतु तरीही ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts