• Home
  • देश
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; G-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित
Top News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; G-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित

An Indian political leader standing with folded hands in front of national flags during an official event

PM Modi South Africa Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं भेट देणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 20व्या G20 शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. विकसनशील देशांमध्ये होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी G20 अजेंड्यावर भारताचा दृष्टिकोन मांडतील.

 

पंतप्रधान मोदी कोणत्या विषयांवर भाषण देणार :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या तिन्ही सत्रांना संबोधित करण्याची अपेक्षा आहे. ही सत्रे खालील विषयांवर केंद्रित असतील-

– समावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, कोणीही मागं न राहता आपल्या अर्थव्यवस्थांची उभारणी, व्यापाराची भूमिका, विकासासाठी वित्तपुरवठा आणि कर्जाचा भार.

– गतिमान जग – G20 चं योगदान: आपत्ती जोखीम कमी करणं, हवामान बदल, न्याय्य ऊर्जा संक्रमण आणि अन्न व्यवस्था.

– सर्वांसाठी एक निष्पक्ष आणि समान भविष्य: महत्त्वपूर्ण खनिज संसाधनं, सभ्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता.

हे ही वाचानेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन? अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू

पंतप्रधान मोदी द्विपक्षीय बैठका देखील घेतील :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेऊ शकतात. वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका (IBSA) नेत्यांच्या बैठकीत देखील सहभागी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts