Ban on journalists at the White House : व्हाईट हाऊसने पत्रकार आणि प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांच्यासाठी असलेल्या ‘अपर प्रेस’ ऑफिसमध्ये प्रवेशावर काही निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे पत्रकारांना पूर्वीप्रमाणे या भागात फिरण्याची किंवा कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची परवानगी मिळणार नाही. या उपायाला ‘मायक्रोमॅनेजमेंट’ आणि माहितीच्या मुक्त प्रवाहातील अडथळा म्हणून पाहिले जात आहे.
हा भाग प्रेस सेक्रेटरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यालयांचा आहे. अनेक दशकांपासून पत्रकारांना या भागात प्रवेश मिळत होता, जेणेकरून ते बातमी गोळा करू शकतील आणि अधिकाऱ्यांशी बोलू शकतील. मात्र, आता पत्रकारांना अपॉइंटमेंटशिवाय ‘अपर प्रेस’ ऑफिसमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. यामुळे पत्रकारांना या भागात पूर्व परवानगीशिवाय जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे बातम्या गोळा करण्याच्या त्यांच्या पारंपरिक पद्धतींवर मर्यादा आल्या आहेत.
पत्रकारांना बातम्या गोळा करण्याच्या कामावर नियंत्रण
याआधीही, व्हाईट हाऊसने ‘असोसिएटेड प्रेस’सारख्या वृत्तसंस्थांना ओव्हल ऑफिस आणि एअर फोर्स वनसारख्या काही ठिकाणी प्रवेश प्रतिबंधित केला होता. मात्र, एका कोर्टाने या निर्बंधांना आव्हान दिले होते आणि ते हटवण्याचे आदेश दिले होते. या नवीन निर्बंधांचा उद्देश पत्रकारांच्या बातमी गोळा करण्याच्या कामावर अधिक नियंत्रण मिळवणे असा मानला जात आहे.
ट्रम्प समर्थक वृत्तसंस्थांना अधिक महत्त्व
जानेवारीमध्ये सत्तेत परतल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने पत्रकारांसाठी प्रवेश नियमांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. ओव्हल ऑफिस आणि एअर फोर्स वन सारख्या ठिकाणी अनेक मुख्य प्रवाहातील वृत्तसंस्थांना प्रवेश कमी करण्यात आला आहे. तर उजव्या विचारसरणीच्या, ट्रम्प समर्थक वृत्तसंस्थांना अधिक महत्त्व देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेक्सिकोच्या आखाताचं नाव बदलून अमेरिकेचं आखात असम ठेवण्याच्या त्यांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्यानम व्हाईट हाऊसनं असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेला ट्रम्प भाषण देतात त्या प्रमुख ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.












