Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्रात खळबळ! ढोंगी खरातच्या संपर्कात होती आमदाराची बायको? तपासात झाला धक्कादायक खुलासा
Top News

महाराष्ट्रात खळबळ! ढोंगी खरातच्या संपर्कात होती आमदाराची बायको? तपासात झाला धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Case | संपूर्ण महाराष्ट्राला ढोंगी ज्योतिषी अशोक खरातने (Ashok Kharat) हादरवून सोडले आहे. आपण ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ असल्याचं सांगत अशोक खरातने अनेकांना गंडा घातला आहे. तसेच त्याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत आणि सेलिब्रिटींसोबत चांगले संबंध होते. तर त्याने आपल्या या प्रसिद्धीचा फायदा घेत अनेक महिलांची फसवणूक करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. तर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा –  राजकारणात खळबळ! नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आमदाराची बायको नराधम अशोक खरातच्या सतत संपर्कात होती?

अशोक खरातला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. सध्या खरात प्रकरणाचा तपास एसआयटीकडून (SIT) केला जात आहे. तर आता या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अशोक खरातच्या भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचा समावेश आहे. अशोक खरातकडे अनेक मंत्री जात होते, त्यामुळे यामध्ये आमदाराची पत्नी देखील भोंदू खरातच्या दरबारात हजेरी लावत असल्याचं समोर आलं आहे. तसेच ती नराधम खरातच्या सतत संपर्कात देखील होती.

नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात अशोक खरातचं कार्यालय आहे. या कार्यालयात आमदाराची पत्नी सतत जात होती. तसेच तिने खरातच्या इशान्येश्वर मंदिरात विधी देखील केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणात अद्याप अधिकृतपणे कोणतंही नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. मात्र, या प्रकरणात आमदाराच्या पत्नीची नेमकी काय भूमिका होती? याबाबतचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, ढोंगीबाबा अशोक खरातला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. यावेळी तपासादरम्यान त्यांना एक पेनड्राईव्ह सापडला होता ज्यात 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात अशोक खरातविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केला आहे.

दुसरीकडे, अशोक खरात प्रकरणातील सर्व धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अशोक खरात प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, अशी शक्यता विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts