Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम! रामनवमी का साजरी केली जाते? जाणून घ्या खास महत्त्व
Top News

श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम! रामनवमी का साजरी केली जाते? जाणून घ्या खास महत्त्व

Ram Navami 2026 | चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र साजरी केले जाते. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी (Shri Ram) रावणाचा वध केला होता त्यामुळे शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो . त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, असं मानलं जातं. त्यामुळे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने रामनवमी (Ram Navami 2026) साजरी केली जाते.

हेही वाचा  – Ram Navami 2026: यंदा २६ की २७ मार्च रामनवमी कधी आहे? वाचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

जाणून घ्या रामनवमीचे खास धार्मिक महत्त्व

चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी रावणाच्या अत्याचाराचा खात्मा करण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतारात जन्म घेतला होता. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार प्रभु श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येत झाला होता. त्यामुळे दरवर्षी या खास दिवशी रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

2026 मध्ये चैत्र शुल्क नवमी तिथी 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल आणि पुढील दिवशीही कायम राहील. त्यामुळे काही ठिकाणी 27 मार्चलाही पूजा केली जाऊ शकते. रामनवमीच्या दिवशी मध्यान्ह काळाला विशेष महत्व दिले जाते, कारण याच वेळी भगवान रामांचा जन्म झाला असे मानले जाते.

रामनवमी दिवशी सर्व भक्त भक्तीभावाने प्रभू रामांची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. मंदिरात जाऊन प्रभू रामांची पूजा करत रामायणाचे पठण करतात. रामनवमी हा फक्त सण नसून तो धर्म, प्रतिष्ठा आणि सत्य याचे प्रतीक आहे. प्रभू श्रीरामांनी त्यांच्या जीवनामध्ये सत्य, धर्म आणि प्रतिष्ठेचे पालन केले होते, त्यामुळे त्यांना ‘मर्यादा पुरूषोत्तम’ म्हणून ओळखले जाते.

रामनवमी दिवशी व्रत करून रामकथा ऐकली तर आपल्या जीवनातील नकारात्मकता संपून सकारात्मकता येते आणि आपल्या मनाला शांती मिळते. त्यामुळे रामनवमी दिवशी प्रत्येकजण आपल्या घरी प्रभू रामांची विशेष पूजा करतात, यामुळे आपल्या कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते.

रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो. हा खास दिवस भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील नवमी तिथीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यंदा रामनवमी 26 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts