Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • धार्मिक
  • जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची स्थापना बिहारमध्ये; 210 मेट्रिक टन वजन तर उंची 33 फूट
Top News

जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची स्थापना बिहारमध्ये; 210 मेट्रिक टन वजन तर उंची 33 फूट

Largest Shivling Temple

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील चकिया-केसरिया मार्गावर बांधल्या जाणाऱ्या विराट रामायण मंदिरासाठी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथून जगातील सर्वात मोठं मोनोलिथिक ग्रॅनाइट शिवलिंग शुक्रवारी (21 नोव्हेंबर) एका धार्मिक विधीनंतर रवाना झाले. हे शिवलिंग 33 फूट उंच आणि 210 मेट्रिक टन वजनाचं आहे.

जगातील सर्वात मोठं रामायण मंदिर

महावीर मंदिर ट्रस्टद्वारे (पाटणा) बांधलं जाणारं विराट रामायण मंदिर 1080 फूट लांब आणि 540 फूट रुंद असणार आहे. यामध्ये 22 मंदिरे, 18 शिखर आणि 270 फूट उंच मुख्य शिखर असणार आहे. तसंच मंदिरातील भिंतींवर रामायणातील दृश्यं कोरलेली असतील. मंदिर प्रवेशद्वार, गणेश स्थळ, सिंहद्वार, नंदी आणि गर्भगृहासाठीचे काम पूर्ण झालं आहे. आता, भव्य शिवलिंगाच्या स्थापनेसह, मुख्य मंदिराच्या बांधकामाला वेग येईल.

हेही वाचा – अमावस्या काळी रात्र तर, पौर्णिमा शुभ्रतेचा चंद्र दोन्ही मधला फरक माहितीय का?

शिवलिंग पोहोचण्यासाठी लागतील 20-25 दिवस

महाबलीपुरमजवळील पट्टिकाडू प्रदेशात एका भव्य ग्रॅनाइट दगडापासून कोरलेलं हे शिवलिंग दहा वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ आहे. कारागिरांनी शिवलिंगाचे सूक्ष्म कोरीवकाम, संतुलन आणि सौंदर्याकडे विशेष लक्ष दिलं आहे. बिहारमधील चकिया इथं शिवलिंग आणण्यासाठी एक खास 96 चाकी ट्रेलर तयार करण्यात आला आहे. प्रचंड वजनामुळं, शिवलिंगाला 96 चाकी हायड्रॉलिक ट्रेलरवर लोड करण्यात आलं आहे. तसंच एका विशेष अभियांत्रिकी पथकाच्या देखरेखीखाली ते हळूहळू आणलं जात आहे. हे शिवलिंग बिहारमध्ये पोहोचण्यासाठी 20-25 दिवस लागण्याची शक्यता आहे.

प्रवासादरम्यान कडक सुरक्षा

महाबलीपुरम ते चकिया या संपूर्ण मार्गावर भाविकांकडून शिवलिंगाच्या भव्य स्वागताची तयारी सुरू आहे. मिरवणूक, पूजा आणि दर्शनासाठी अनेक शहरांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. ट्रेलर विविध ठिकाणी थांबणार आहे, तिथं उपस्थित पुजारी शिवलिंगाची धार्मिक पूजा करतील. शिवलिंग आणल्या जाणाऱ्या मार्गांवर नियोजन करण्यासाठी, वाहतूक वळवण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि महावीर मंदिर ट्रस्ट समिती एकत्रितपणे काम करत आहे. तसंच भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावं, यासाठी प्रत्येक थांब्यावर बॅरिकेड्स बसवले जाणार आहेत. अभियंत्यांच्या टीम प्रत्येक किलोमीटरवर तांत्रिक तपासणी करत आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts