Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवारांविरोधात लक्ष्मण हाके मैदानात उतरणार? निवडणूक लढवण्याचे संकेत..
Top News

सुनेत्रा पवारांविरोधात लक्ष्मण हाके मैदानात उतरणार? निवडणूक लढवण्याचे संकेत..

Laxman Hake vs. Sunetra Pawar Election

Bypoll in Baramati : बारामतीमध्ये पोटनिवडणूक (Bypoll in Baramati) 23 एप्रिलला होऊ घातली असून 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एक अनपेक्षित आणि मोठा ‘ट्विस्ट’ पाहायला मिळत आहे. जी निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होत, तिथे आता संघर्षाची ठिणगी पडली आहे, त्यामुळे सुनेत्रा पवारांविरोधात (Deputy CM Sunetra Pawar) धनगर समाज उमेदवार का? या प्रश्नाचा उत्तर येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी नामंतराची पेटलेली (Renaming of the Hospital) ठिणगी वणवा होणार की विझणार हे त्यापूर्वीच समजणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी निवडणूक लढवण्याचे सांकेत दिले आहेत.

निमित्त ठरलंय ते म्हणजे बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण.’पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ यांचे नाव बदलण्याचं, तिथे ‘अजित पवार’ यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेने धनगर समाज आक्रमक झाला असून, आता थेट निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे. अहिल्यादेवींचे नाव हटवणे हा केवळ नावाचा बदल नसून तो समाजाच्या अस्मितेचा अपमान असल्याची भावना धनगर समाजात आहे, त्यामुळेच धनगर समाज आणि सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याने ‘बिनविरोध’ निवडणुकीच्या गणिताला खीळ बसली आहे.

हेही वाचा – अखेर शिखर बँक घोटाळा प्रकरण ‘क्लोज’? पवार कुटुंबियांना मिळाली क्लीन चिट; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

अहिल्यादेवींचे नाव पुसण्याचा प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही – बापूराव सोनलकर

अजितदादांबद्दल आम्हाला आदर आहेच, मात्र अहिल्यादेवींचे नाव पुसण्याचा प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही. हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे..शासनाने काढलेला जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा..यानंतर आम्ही ही निवडणूक लढवायची की नाही याबाबत विचार करू, असा इशारा यशवंत ब्रिगेड सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी दिला आहे..

सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आहे…. यांच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही…असं स्पष्ट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

बारामती मतदार संघात धनगर समाजाची मोठी वोट बँक

विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या बहुसंख्येने असल्याने धनगर समाज अनेकदा निर्णायक ठरला आहे. यामध्ये इंदापूर बारामती दौंड पुरंदर भोर या अनेक तालुक्यांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून विशेषता बारामती विधानसभेची आकडेवारी जवळपास तीन लाखाच्या आसपास आहे यामध्ये धनगर समाज प्रथम क्रमांक वर येत असून एक लाख मतदार ही धनगर समाजाची वोट बँक असल्याने अनेकदा बारामती विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान धनगर समाजातील नेत्यांनी यामध्ये विधानसभेला गोपीचंद पडळकर तर लोकसभेला महादेव जानकर या धनगर समाजातील नेत्यांनी निवडणुका लढली आहेत.

अजितदादांनी धनगर समाजाला मोठ मोठे पदे देखील दिलेली

असं जरी असलं तरी बारामती तालुक्यात बहुतांशी धनगर समाज हा अजित पवारांच्या पक्षात आणि पाठीशी आहे. यामध्ये अजितदादांनी यांनी धनगर समाजाला मोठ मोठे पदे देखील दिलेली आहेत यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पासून ते सभापती पर्यंत अनेक पदे धनगर समाजाला दिली असल्याने बहुतांशी धनगर समाज अजित पवारांच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे…. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शासकीय महाविद्यालयाच्या दरम्यान सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव देण्यात येऊ नये यासाठी हाके यांनी घेतलेल्या मोर्चाला फक्त शेकडो लोक उपस्थित होते.

आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला तयार – फडणवीस

बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असे बहुतेक पक्षांची इच्छा आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल स्वतः स्पष्टीकरणही दिल आहे, फडणवीस म्हणतात. बारामती आणि राहुरी या दोन्ही ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला तयार आहोत असेही आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे.

निवडणूक लढवण्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे संकेत

निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आहे. जर निवडणूक बिनविरोध होणार असेल, तर तो लोकशाहीला मोठा धोका आहे,”असे स्पष्ट मत व्यक्त करत बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय. निवडणूक अधिसूचना जारी झाल्यापासून शेकडो कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याने,सध्या तालुक्यातील गावागावांत जाऊन जनभावना जाणून घेण्याचे काम सुरू असल्याचं मत हाकेंनी व्यक्त केलंय.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts