मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील ही घटना इतकी भयावह आहे की संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तीन वर्षांची निरागस चिमुकली खेळायला बाहेर गेल्यानंतर काही वेळेतच बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता गावाच्या बाहेर दगडांच्या आड तिचा मृतदेह आढळून आला. आरोपी संजय खैरनार हा मुलीच्या नातेवाईकांना परिचित असल्याचं कळल्यानं ग्रामस्थांचा संताप आणखीनच वाढलाय.







