Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
Top News

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

Under 19 World Cup schedule

Under 19 World Cup schedule : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जानेवारी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर १८ मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना असते. मात्र, आयसीसीने घेतलेल्या एका आश्चर्यकारक निर्णयामुळे आता ही संधी मावळली आहे. कारण आयसीसीने गेल्या काही वर्षांपासून सुरु बदलांमुळे काही अंशी या शमवल्याचं दिसत आहे. आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही गटांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलं आहे. त्यामुळे साखळी फेरीत हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार नाहीत. मात्र, बाद फेरीत दोन्ही संघ एकमेकांना भिडू शकतात. 

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

वनडे फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणारी ही स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर 6 फेब्रुवारीला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ असून चार गटात विभागणी केली आहे. यात सर्वाधिक पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या भारतीय संघाला अ गटात ठेवलं आहे. या गटात भारतासोबत न्यूझीलंड, बांग्लादेश आणि अमेरिका आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायोत होईल.

हेही वाचा – बीसीसीआयने शुभमन गिल बाबत दिली महत्त्वाची अपडेट! “तो संघासोबत गुवाहाटीला जाईल, पण…”

ही स्पर्धा पुढच्या पिढीतील आयकॉननाही समोर आणते; जय शहा 

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं की, या स्पर्धेची उत्सुकता आहे. यात जागतिक क्रिकेटमधील भविष्यातील तारे दिसतील. “आयसीसी अंडर 19 मेन्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही केवळ पुढच्या पिढीतील क्रिकेटपटूंनाच नव्हे तर पुढच्या पिढीतील आयकॉननाही समोर आणते. ब्रायन लारा आणि सनथ जयसूर्यापासून ते विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि शुबमन गिलपर्यंत, या स्पर्धेने आपल्या खेळाचे भविष्य सातत्याने घडवले आहे.”

या स्पर्धेत एकूण 16 संघ असून चार गटात विभागणी

गट अ मध्ये भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. गट ब मध्ये सह-यजमान झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड आहेत. गट क मध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया , आयर्लंड, जपान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. गट ड मध्ये टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.


img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts