Captain death: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचे (Iran-Israel-America War) गंभीर परिणाम समोर येताना दिसत आहेत. त्यातच एक दुःखदायक बातमी समोर आली आहे. २८ फेब्रुवारीपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) अडकलेल्या ‘अवाना’ (Awana) जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह (Captain Rakesh Ranjan Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे कुटुंब रांची (ranchi) येथे राहत आहे. ते मूळचे बिहार जिल्ह्यातील आहेत.
हे ही वाचा: थुंकी पडली दीड लाख रुपयांना; लंडनमध्ये २ भारतीयांना दंड
‘अवाना’ जहाजावर रुजू
कॅप्टन राकेश रंजन सिंह गेल्या महिन्यात २ फेब्रुवारी रोजी आपली रजा पूर्ण करून ‘अवाना’ जहाजावर रुजू झाले होते. हे जहाज तेल घेण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीला गेले होते. तेल भरल्यानंतर, हे जहाज १ मार्च रोजी भारताकडे निघाले, परंतु युद्धाच्या परिणामामुळे दुबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर समुद्रात नांगर टाकून थांबले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.
३५ कर्मचारी अडकले
कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी ‘अवाना’ जहाजावर होते. ते गेल्या १८ दिवसांपासून समुद्रात अडकले होते. या काळात कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना नियमित वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. १८ मार्च रोजी कॅप्टन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ दुबई एटीसीशी (Dubai ATC) संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची (air ambulance) विनंती केली, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांना बोटीने दुबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले, पण या प्रक्रियेला बराच वेळ लागला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.











