Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • भारताला ऊर्जा ? कुठला आहे इराणशी व्यापार..!
Top News

भारताला ऊर्जा ? कुठला आहे इराणशी व्यापार..!

flag

Energy for India : इराण-इस्राईल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे (Iran-Israel and US War) अनेक देशांना इंधन संकटाचा सामना करावा लागत आहे. या युद्धामुळे अनेक देशांना फटका बसत आहे. त्यात भारतालाही मोठ्या संकटाला सामना करावा लागत आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे भारताने इराणकडून एलपीजी गॅस (LPG Gas) आणि कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करणे बंद केले. मात्र अमेरिकेने आता निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे इराणबरोबर मैत्रीचा हात पुढे केला असून भारताने इराणशी व्यापार करण्याचा निर्धार केला आहे. परिणामी भारताला आणखी ऊर्जा मिळाली आहे.

हे ही वाचा: सॅटेलाइट बंद…! तिन्ही सैन्य दलांसमोर मोठे आव्हान, परदेशी प्रणालीवर कसा विश्वास ठेवायचा?

राणचे तेलवाहू जहाज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर

दरम्यान, इराणचे तेलवाहू जहाज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर लवकरच पोहचण्याची शक्यता आहे. शिपिंग डेटाच्या रिपोर्टनुसार, ऑरोरा नावाचे प्रतिबंधित इराणी एलपीजी घेऊन निघाले आहे. भारतात आज मोठ्या प्रमाणात एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक लोकांना आपली हॉटेल्स बंद करावी लागली.

होर्मुज खाडीतून भारताला सुरक्षित मार्ग

होर्मुज खाडीतून भारताला सुरक्षित मार्ग दिला जात असल्याचे इराणने स्पष्ट केले. भारत हा आमचा मित्र देश असल्याने त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देणार असल्याचे इराणकडून सांगण्यात आले. मात्र, असे असले तरीही भारताचे तब्बल 20 जहाज होर्मुज खाडीत अडकले आहेत. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे.

भू-राजकीय आव्हाने

भारत आणि इराणचे संबंध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामरिक स्तरावर मैत्रीपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे राहिले आहेत. चाबहार बंदर विकास, ऊर्जा सुरक्षा आणि मध्य आशियाशी जोडण्यासाठी इराण भारतासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे, मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे या मैत्रीत भू-राजकीय आव्हानेही आहेत.

भारत-इराण मैत्रीची प्रमुख वैशिष्ट्ये:

ऐतिहासिक व सांस्कृतिक दुवे: दोन्ही संस्कृती हजारो वर्षे जुन्या असून, भाषा (फारसी), कला आणि व्यापाराद्वारे एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
चाबहार बंदर: भारताने इराणमधील चाबहार बंदर विकसित केले आहे, जे पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
ऊर्जा सहकार्य: इराण हा भारतासाठी कच्च्या तेलाचा एक महत्त्वाचा आणि विश्वासू पुरवठादार राहिला आहे, जो बऱ्याचदा अनुकूल अटींवर तेल पुरवतो.
भू-राजकीय आव्हाने: इराणवरील अमेरिकेचे निर्बंध आणि भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या वाढत्या मैत्रीमुळे भारत-इराण संबंधांवर परिणाम झाला आहे.
त्रिकोणी संबंध: अफगाणिस्तानच्या स्थिरतेसाठी भारत आणि इराणचे हितसंबंध एकसारखे आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts