iran-israiel-america war : इराण-इस्राईल आणि अमेरिका युद्धाचा (iran-israiel-america war) फटका अनेक देशांना बसत आहे. त्यात भारताचाही (india) समावेश आहे. या युद्धामुळे भारतात इंधन टंचाई (Fuel Shortage) जाणवत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने (central government) पावले उचलली आहेत. दरम्यान, भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इराणकडून भारतासाठी होर्मुज खाडी (Gulf of Hormuz) खुली करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे देशातील इंधन टंचाई मात करण्यास केंद्र सरकारला यश येणार आहे.
हे ही वाचा: 26 मार्चला शेअर मार्केट बंद राहणार का? जाणून घ्या शेवटच्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी
अनेक देशात अभूतपूर्व इंधन टंचाई
28 फेब्रुवारी 2026 ला इस्राईल आणि अमेरिका या देशांनी संयुक्त कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला. त्यामुळे इराणनेही त्याला प्रत्युत्तर दिले. परिणामी हे युद्ध आणखीनच भडकले. या युद्धादरम्यान इराणने होर्मुज खाडी बंद करत अनेक देशांना धक्का दिला. त्यामुळे अनेक देशात अभूतपूर्व इंधन टंचाई निर्माण झाली. त्याचा सार्वधिक फटका भारताला बसला. सध्याच्या घडीला भारताचे 20 तेलवाहू जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत.
अमेरिका आणि इस्त्रायलचे जहाज मात्र सोडणार नाही
दरम्यान, 25 दिवसानंतर आता भारताला आनंदाची बातमी मिळत आहे. इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्याचे संकेत देण्यात आले. मात्र, त्यांनी एक मोठी अट ठेवली. इराणने इतर देशांचे जहाज सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र इराणने अटही ठेवली आहे. त्या अटीत त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्त्रायल यांचे जहाज आम्ही सोडणार नाही.
अडकलेले 20 जहाज भारताच्या दिशेने येणार
दम्यान, आमच्या स्वत:च्या संरक्षणासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत. म्हणजे भारताचे अडकलेले 20 जहाज भारताच्या दिशेने येऊ शकतात. भारतासाठी करण्यात येत असलेला एलपीजी गॅसचा पुरवठा होर्मुज खाडीतूनच होतो. परंतु ही खाडी बंद असल्याने मोठा फटका भारताला बसला. भारतात मोठा गॅस तुटवडा निर्माण झाला. त्याचा फटका देशातील हॉटेल व्यासायिकांना बसला. काही हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल व्यासायिकांवर आली. त्यामुळे खवैयांचे मोठे वांदे झाले आहेत.
कच्चे तेल आणि गॅसची समस्या दूर
होर्मुज खाडीतून जाताना जहाजांना इराणच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करूनच जावे लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जहाजांना इराणच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करावी लागेल. सुरक्षित मार्ग नक्की कोण हे इराणचे अधिकारी जहाजांना सांगतील. इराणच्या या निर्णयाने कच्चे तेल आणि गॅसची समस्या दूर होऊ शकते. यासोबतच जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमतीही कमी होऊ शकतात.












