Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • फरार नीरव मोदीला झटका; याचिका फेटाळल्याचा फटका
गुन्हा

फरार नीरव मोदीला झटका; याचिका फेटाळल्याचा फटका

nirav modi

nirav modi pnb scam : पंजाब नॅशनल बँकेला (punjab nationl bank) १३ हजार कोटींचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला (nirav modi) चांगलाच झटका बसला. मोदी याचे भारतात प्रत्यार्पण करावे, अशी याचिका केंद्रीय अन्वेषण ब्युरोची (Central Bureau of Investigation) आहे. मात्र भारतात होणाऱ्या प्रत्यार्पणाला मोदीने लंडन उच्च न्यायालयात (London High Court) आव्हान दिले. परंतु याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याचिका फेटाळण्याचा फटका बसल्याने मोदी याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा: अशोक खरात प्रकरण तापलं! अश्लील व्हिडीओ तात्काळ डिलीट करण्याचे आदेश; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, आरोपींवर गुन्हा दाखल

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार कोटींचा चुना

नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी (mehul choksi) या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार कोटींचा चुना लावला. आर्थिक अपहार केल्याने या दोघांवर विविध न्यायालयात खटले सुरु आहेत. एकट्या नीरव मोदीवर 6,498.20 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. 19 मार्च 2019 पासून नीरव मोदी हा यूकेच्या न्यायालयात तुरुंगवासात आहे.

नीरव मोदी याची याचिका

उच्च न्यायालयाचा किंग्ज बेंच खंडपीठात (King’s Bench Division) या पूर्वी नीरव मोदी याने याचिका दाखल केली होती. क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या वकिलांनी, केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) पथकाच्या मदतीने, त्याच्या याचिकेच्या विरोधात युक्तिवाद सादर केला. तपास अधिकाऱ्यांसह सीबीआय अधिकाऱ्यांचे एक पथक सुनावणीसाठी लंडनला गेलं होतं. परंतु नीरव मोदी याचा अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. याचिका आणि त्यासंबंधित परिस्थिती इतकी असाधारण नाही, की प्रकरणाची फेरसुनावणी करणे आवश्यक ठरेल असं नीरव मोदीची याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटल्याचं प्रवक्त्याने सांगितलं.

फरार आर्थिक गुन्हेगारांची अनेक प्रकरणं

बडे उद्योगपती, व्यावसायिक यांनी देशातील बँकांकडून प्रचंड मोठ्या रकमांचं कर्ज घ्यायचं, नंतर त्या कर्जाची परतफेड करायची नाही आणि देशाबाहेर पलायन करून आरामात आलिशान आयुष्य जगायचं.भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या प्रत्यर्पणासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश येत नाहीये. अशा फरार आर्थिक गुन्हेगारांची अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात देशासमोर आली आहेत.

मेहुल चोकसी

पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं 2018 च्या सुरुवातीला समोर आलं होतं. त्यावेळी पंजाब नॅशनल बँकेनं मेहुल चोकसी, नीरव मोदीसह इतर काही जणांविरोधात तक्रार नोंदवली होती. एकेकाळी मेहुल चोकसी भारतातील हिरे व्यापाराचा पोस्टर बॉय होता.

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदी हा देखील एक आरोपी आहेत. जानेवारी 2018 मध्ये नीरव मोदीनं भारतातून पलायन केलं होतं.

विजय माल्ल्या

भारत सरकारचा दावा आहे की किंगफिशर कंपनीचे मालक विजय माल्ल्या याच्यावर भारतीय बँकांचं 9 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज आहे. 1992 मध्ये भारत आणि ब्रिटन मध्ये प्रत्यर्पण करार झाला होता. मात्र, हा करार झाल्यापासून फक्त एकाच व्यक्तीचं प्रत्यर्पण झालं आहे.

ललित मोदी

ललित मोदी हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलचा माजी प्रमुख आहे. त्यानंदेखील भारतातून पलायन केलं असून तो 2010 पासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. आयपीएलच्या प्रमुखपदी असताना लिलाव प्रक्रियेत कथितरित्या घोटाळा केल्याचा आरोप ललित मोदीवर आहे.

नितिन संदेसरा

नितिन संदेसरा हा गुजरातमधील एक मोठा व्यावसायिक आहे. तो स्टर्लिंग बायोटेकचा मालक आहे. 5,700 कोटी रुपयांच्या बँक फ्रॉड आणि मनी लाँडरिंग प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts