Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • …तर भारत इंधनाबाबत होईल स्वावलंबी; ओएनजीसीचा कुठला आहे महाकाय प्रकल्प?
Top News

…तर भारत इंधनाबाबत होईल स्वावलंबी; ओएनजीसीचा कुठला आहे महाकाय प्रकल्प?

ongc

oil and natural gas corportion : समुद्राच्या खोल पाण्यात उत्खनन (Excavation in the Deep Waters of the Ocean) करण्यासाठी ओएनजीसीने (oil and natural gas corportion) एक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी कंपनीने २० अब्ज डॉलर्स (20 billion dollars) (सुमारे १.६ लाख कोटी रुपये) मूल्याची जागतिक निविदा (Global Tender) प्रसिद्ध केली आहे. भारताचे परकीय इंधनावरील (Foreign Fuel) अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे भारतातील इंधन टंचाईवर (Fuel Shortage) मात करण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे भारत इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही.

हे ही वाचा: आनंदाची बातमी: इराण भारतासाठी होर्मुज खाडी खुली करणार

खोल समुद्रातील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित

दरम्यान, हा प्रकल्प प्रामुख्याने भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील खोल समुद्रातील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. जिथे कच्च्या तेलाचे आणि वायूचे मोठे साठे असण्याची शक्यता आहे. खोल समुद्रात ड्रिलिंग करणे अत्यंत कठीण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असते.

जागतिक स्तरावरील अनुभवी कंपन्यांची मदत

यासाठी ओएनजीसी जागतिक स्तरावरील अनुभवी कंपन्यांची मदत घेणार आहे. सध्या भारत आपल्या गरजेच्या ८५% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो. या प्रकल्पामुळे देशांतर्गत उत्पादनात मोठी वाढ होऊन आयातीवरील खर्च कमी होईल.

बड्या तेल कंपन्यांचे लक्ष भारताकडे

या २० अब्ज डॉलर्सच्या निविदेमुळे जगातील बड्या तेल कंपन्यांचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. यामध्ये तांत्रिक भागीदारी, ड्रिलिंग रिग्जचा पुरवठा आणि दीर्घकालीन सहकार्य यांचा समावेश असेल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकसभेत देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर ओएनजीसीचा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर हा प्रकल्प यशस्वी झाला, तर भारताला भविष्यात इंधनासाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts