रशिया : रशिया महासत्ता बनण्याच्या मार्गावर असताना अनेक देशांसोबत वितुष्ट निर्माण झाले होते. मात्र, भारत–रशिया मैत्री सर्वदूर प्रसिद्ध असताना मात्र, रशिया मैत्री निभावत नसताना दिसत आहे. कारण, भारत आणि रशियाचे संबंध आतापर्यंत अत्यंत चांगले राहिले असतानाही, भारताने सातत्याने केलेली विनंती बाजूला सारून, रशियाने पाकिस्तानला JF-17 फायटर जेटचे इंजिन सप्लाय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन चीन JF-17 जेटसाठी तयार करतो. मात्र, त्याची निर्मिती रशियावर अवलंबून आहे.
‘डिफेंस सिक्योरिटी एशिया’ ने दिलेल्या माहितीनुसार, भारताने रशियाला दीर्घकाळ हे इंजिन पाकिस्तानला देऊ नये, अशी विनंतीपूर्वक आग्रह केला होता. मात्र, तरीही मॉस्कोने भारताच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याच पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी हवाई दल आपली शक्ती वाढवण्यासाठी नेहमीच चीनची मदत घेत असतो. JF-17 हे 4.5 जनरेशनचे फायटर जेट आहे. आता पाकिस्तान ब्लॉक III बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ब्लॉक I आणि ब्लॉक II आधीपासूनच आहेत, परंतु हे तुलनेने कमकुवत मानले जातात.
पुतीन डबल गेम तर खेळत नाही ना?
एकीकडे रशिया भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याच्या प्रयत्नांत असतो. मात्र, आता पाकिस्तानशीही हातमिळवत आहे. हा डबल गेम तर नाही ना? खरे तर, पुतिन यांनी भारताची विनंती फेटाळून एकप्रकारे दुहेरी गेम खेळत असल्याचे संकेत दिले आहेत.
चीन आणि पाकिस्तान यांच्यातील घट्ट नाते
भारताचे चीनसोबतचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. पण, चीन आणि पाकिस्तानचे नाते अतिशय दृढ आहे. पाकिस्तानी सैन्याचे बहुतेक शस्त्रास्त्रे आणि विमाने चीनवर अवलंबून आहेत.आणि त्यातच आता JF-17 या इंजिन चीनकडून तयार केली जात असतानाच, रशियाकडे त्याच्या निर्मितीची जबाबदारी आहे. आणि भारताने विनंती करूनही, त्याकडे दुर्लक्ष करून हे इंजिन पाकिस्तानला पुरवले जात असल्याने, पुतिनच्या या डबल गेमवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.