Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मी इथला भाई’ म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयन्त, पोलिसांनी आरोपीसह वडिलांच्याही मुसक्या आवळल्या
गुन्हा

मी इथला भाई’ म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयन्त, पोलिसांनी आरोपीसह वडिलांच्याही मुसक्या आवळल्या

उल्हासनगर : मागील काही महिन्यांपासून घडलेल्या अनेक घटनांच्या माध्यमातून हे समोर आलं आहे,कि उल्हासनगरमध्ये भाईगिरी करून गुन्हेगारी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातला आहे. भरदिवसा चाकूने हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा ट्रेंडच काही गुंड लोकांनी या परिसरात सुरु केला होता. आताही उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. उल्हासनगरमध्ये कॅम्प क्रमांक 2 मध्ये बंजारा विकास परिषदेने गरब्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात गोळीबाराची भयंकर घटना घडली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दहशत निर्माण करणारे सराईत गुंड सोहम पवार आणि त्याचे वडील अनिल पवार यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून आरोपींकडे असलेलं पिस्तूलही पोलिसांनी जप्त केलं.

‘मी इथला भाई..’, आरोपीने हवेत गोळी झाडली अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, गरबा कार्यक्रमादरम्यान आरोपी सोहम पवारने लोकांना दम भरत, मी इकडचा भाई आहे, म्हणत सोहमने हवेत गोळ्या झाडल्या. या गंभीर गुन्ह्यात सोहमचे वडील अनिल पवारनेही त्याला साथ दिली आणि परिसरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही आरोपींनी शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावर थेट बंदूक ताणून दहशत पसरवली होती. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त सचिन गोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, बुधवारी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये आरोपी पिता पुत्राला पोलिसांनी अटक केली.

उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून काल रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. गरबा खेळण्यासाठी आपण कुणाची परवानगी घेतली, यावरून आरोपी आणि फिर्यादीचे वादविवाद होते. याच वादातून आरोपीने हवेत एक राऊंड फायर केला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडीलही होते. याप्रकरणी दोन्ही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधीतांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याविषयी सविस्तर तपास उल्हासनगरचे अधिकारी करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts