Trump sanctions Russian oil companies : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेनमधील संघर्ष मिटवण्याकरिता कठोर पाऊल उचललं आहे. रशियाच्या दोन सर्वात मोठ्या खनिज तेल कंपन्यांना लक्ष्य करुन त्यांनी नवीन निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर होणारी बैठकदेखील रद्द केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांची भेट घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध मिटेल, अशी आशा व्यक्त केली. त्यांच्या (रशियाच्या) दोन मोठ्या तेल कंपन्यांविरुद्ध खूप मोठे निर्बंध आहेत. आम्हाला आशा आहे की ते (रशिया आणि युक्रेन संघर्ष) जास्त काळ चालणार नाही. हे युद्ध मिटेल, अशी आम्हाला आशा आहे, असे ट्रम्प यांनी म्हटलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करताना मागील वेळी कोणतंही यश आलं नव्हतं.
हे हि वाचा : iPhone 17 Pro Max turning pink : केशरी रंगाचा iPhone 17 Pro Max गुलाबी होतोय? Apple सपोर्टनं सांगितला उपाय
का केली बैठक रद्द ? : (Trump sanctions Russian oil companies)
ट्रम्प यांनी मंगळवारी हंगेरीतील बुडापेस्टमध्ये पुतिन यांच्याशी होणारी नियोजित बैठक रद्द केली. निष्फळ होणारी बैठक नको आहे, असं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. याबाबत ट्रम्प म्हणाले, आम्ही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी होणारी बैठक रद्द केली. आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे, तिथं आम्ही पोहोचणार आहोत, असं वाटत नाही. हा केवळ वेळेचा अपव्यय आहे. म्हणून, मी बैठक रद्द केली. परंतु आम्ही भविष्यात बैठक करू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
🚨 President Donald Trump has reportedly canceled a planned meeting with Russian President Vladimir Putin while also announcing new oil sanctions on Moscow. @POTUS https://t.co/vjG8BLHsqI pic.twitter.com/lGGDgBSX3C
— The Dallas Express News (@DallasExpress) October 23, 2025
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न : (Trump sanctions Russian oil companies)
सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यात झालेल्या फोन कॉलनंतर ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात, ट्रम्प यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी अडीच तास फोनवर चर्चा केली. त्यावेळी संभाषणात मोठी प्रगती झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. गाझामध्ये युद्धबंदीची कथित मध्यस्थी केल्यानंतर ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाकडं आपलं लक्ष वळवलं आहे. ऑगस्टमध्ये अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील शिखर बैठकीत कोणताही करार झाला नव्हता. ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी आग्रही आहेत











