येत्या आठवड्यात दिवाळी या मोठ्या सणाला सुरुवात होत आहे. हा सण तोंडावर असताना महागाई प्रचंड वाढली आहे. दरवर्षी दिवाळी च्या तोंडावर ट्रॅव्हल्स बसेस प्रचंड पैसे आकारतात. यंदा विमान कंपन्यांनी ट्रॅव्हलिंगची वाढती मागणी लक्षात घेऊन तिकिटाचे दर दुप्पट ते तिप्पट वाढवले आहे. त्यामुळे जर तुम्ही विमानाने मलेशिया आणि सिंगापूर जाणार असाल तर तुम्हाला तिप्पट पैसे मोजावे लागणार आहे.
दिवाळी काही दिवसांवरच असताना विमान तिकिटाचे दर गगनाला भिडले आहे. खास करून देशांतर्गत विमानसेवेचे दर वाढल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. दिवाळीच्या सुट्टींमध्ये लॉन्ग विकेंड असल्यावर बरेच जण परदेशात जाण्याचा प्लॅन करतात. यंदा लॉन्ग विकेंड वर परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ केली आहे.
असे असतील तिकीट दर
जर तुम्ही मुंबईहून उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 30 हजार रुपये मोजावे लागणार आहे. यासह तुम्हाला दिल्ली हॉंगकॉंग जायचे असेल तर 16 हजार 282 रुपये मोजावे लागतील. मुंबई हुन प्रयागतराज चे तिकीट दर 20 हजार 403 इतके आहे तर दिल्ली ते सिंगापूरसायचे तिकीट 17 हजार 799 इतके आहे. यासह कानपूर साठी 20 हजार 404 रुपये तिकीट आहे. परंतु तुम्ही जर दिल्ली ते मलेशिया जाणार असाल तर 13 हजार 315 इतके रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे. म्हणजेच तुलनेत आंतरराष्ट्रीय प्रवासभाडे कमी आहे. तुम्ही दिल्लीहुन वाराणसी जाणार असाल तर 20 हजार 038 इतके तिकीट तुम्हाला भरावे लागणार आहे.
या आकडेवारीनुसार देशांतर्गत प्रवासापेक्षा आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त आहे. या तिकीट दारावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. रेल्वे, वंदे भारत, बस सेवा, ट्रॅव्हल्स यासारख्या सर्व सुविधांचे तिकीट दर प्रचंड वाढलेत, तर वंदे भारत चे तिकीट काढताना प्रचंड अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. हे दर सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे असून यावर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे.