Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन दोन दिवस भारत दौऱ्यावर, या भेटीवर संपूर्ण जगाचं लक्ष..
Top News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन दोन दिवस भारत दौऱ्यावर, या भेटीवर संपूर्ण जगाचं लक्ष..

vladimir-putin Narendra Modi

Vladimir Putin India Visit : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 4 आणि 5 डिसेंबर असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येणार आहेत. पुतिन यांच्या भारत दौऱ्याची अमेरिकेसह संपूर्ण जगात चर्चा आहे. कारण या दौऱ्यात अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होणार आहे.रशियाचं युक्रेन विरोधात सध्या युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन तीन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या रशियन कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियन शब्दावर घातली बंदी; केले हे वादग्रस्त वक्तव्य

युरोपियन देश युक्रेनला शस्त्र पुरवठा करत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. युरोपियन देशांनी युक्रेनला अनेक घातक शस्त्र दिली आहेत. त्यामुळे युक्रेन अजून माघार घेत नाहीय. या पार्श्वभूमीवर भारतात निघण्याआधी पुतिन यांनी युरोपियन देशांना मोठा इशारा दिला आहे. “युरोपला कुठला संघर्ष किंवा युद्ध हवं असेल, तर रशिया यासाठी पूर्णपणे तयार आहे. रशियाला हे युद्ध सुरू करण्याची इच्छा नाही. मात्र, आम्हाला भाग पाडलं तर, मागे हटणार नसल्याचं व्लादीमीर पुतिन यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.

दोन वाणिज्य दूतावास आणि Su-57 वर चर्चा

भारत आणि रशिया यांच्यातील राजकीय संबंध वाढवण्यासाठी कझाक आणि येकातेरिनवर्ग मध्ये नवीन वाणिज्य दुतावास सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याचा फायदा रशियात काम करणाऱ्या भारतीय कामगारांना होईल. आणखी एक महत्त्वाचा मोठा निर्णय म्हणजे Su-57 वर दोन्ही देशांत मोठा संरक्षण करार अपेक्षित असल्याची चर्चा आहे. पुतिन यांचा हा दौरा २०२१ नंतर पहिला अधिकृत भारत दौरा आहे. यामुळे याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुतिनच्या भारत भेटीत या विषयांवर होणार चर्चा..

भारत आणि रशियामधील कामगारांसाठी देखील पुतिन यांच्या दौऱ्यात अंतिम मसुदा कराराची अपेक्षा आहे. यामुळे भारतीय कामगारांसाठी रशियात काम करण्याच्या नव्या संधी प्राप्त होणार आहेत. मात्र, भारताने कामगारांना कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. तसचं भारत आणि रशियामध्ये व्यापार वाढवणे हा देखील पुतिन यांच्या दौऱ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे सध्या दोन्ही व्यापार तूट वाढत असून ही करणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आहे. यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी चर्चा करतील. दोन्ही देशातील दीर्घकालीन ऊर्जा आणि कृषी संबंध देखील सुनिश्चित केले जाणारल आहेत. या व्यतिरिक्त भारतीय रूपया आणि रशियन रुबल सेटलमेंट सिस्टिमवर देखील चर्चा करण्यात येईल.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts