Viral Love Story : सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ही जपानी लव्ह स्टोरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल, पण ज्या व्यक्तीच्या मांडीवर लहानपणी खेळली, त्याच व्यक्तीशी पुढं लग्न केल्याची ही कथा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तब्बल 30 वर्षांच्या वयाच्या अंतराची ही जोडी लाखोंच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
जपानमधील कागावामधून उगवलेली अनोखी प्रेमकहाणी
ही कथा जपानच्या कागावा प्रांतातील. मिझुकी (वय 53) हे आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या घरी वर्षानुवर्षे येत-जात असत. त्यावेळी तिची मुलगी मेगुमी केवळ 5 वर्षांची होती. घरात मोठ्या माणसाप्रमाणे तिला प्रेमानं मांडीवर घेऊन खेळवणारे मिझुकी त्या वेळचे काका आज तिचे पती झाले आहेत. ही शक्यता तेव्हा कुणाच्याही कल्पनेपलीकडची होती.
हे ही वाचा – योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले विभक्त होणार ? सोशल मीडियावर चर्चा
अनपेक्षित भेटीतून पुन्हा सुरु झाला संपर्क
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये मेगुमीनं आईच्या दुकानात मदत करण्यास सुरुवात केली आणि त्याच काळात मिझुकी यांच्यासोबत पुन्हा भेटी घडू लागल्या. एक दिवस तिघं मिळून चित्रपट पाहायला जाणार होते, मात्र मेगुमीची आई झोपून गेल्यानं मिझुकी आणि मेगुमीची पहिली अधिकृत डेट घडून आली.
पहिल्या डेटनं बदललं नात्याचं स्वरुप
चित्रपटानंतर दोघांनी एकत्र जेवण घेतलं. त्यावेळी मिझुकी यांच्या साधेपणानं आणि नम्र स्वभावानं मेगुमी प्रभावित झाली. हळूहळू ती आठवड्यातून किमान एकदा तरी त्यांना भेटण्यासाठी निमित्त काढू लागली. तिच्यासाठी हे सुरुवातीला केवळ मैत्रीपूर्ण नातं होतं. नात्याची दिशा तेव्हा बदलली जेव्हा मेगुमीनं मिझुकी यांना एका महिलेशी बोलताना पाहिलं आणि तिला जाणवलं ही भावना फक्त आदर किंवा आपुलकी नाही, तर प्रेम आहे. त्यानंतर दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही 30 वर्षांच्या वयाच्या अंतराची जोडी आज चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. काही जण त्यांचं कौतुक करत असताना, काही जण वाद निर्माण करत आहेत. मात्र, दोघांसाठी हा निर्णय आयुष्यभराचा साथीदार निवडण्याचा आणि प्रेमाला वयाची मर्यादा नसल्याचा पुरावा आहे.












