Tanya Mittal net worth : काही दिवसांपूर्वी बिग बॉस 19 फिनाले पार पडला. या फिनाले मध्ये बिग बॉस 19 ची ट्रॉफी गौरव खन्नाने आपल्या नावावर केली. म्हणजेच तो बिग बॉसच्या सिझन 19 चा विजेता ठरला. त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास कधीच वादग्रस्त ठरला नाही. गौरव खन्ना बॉग बॉस च्या घरात नेहमी शांततेत आणि हुशारीने गेम खेळताना दिसला. गौरव खन्ना जरी बिग बॉस 19 सीझनचा विजयी ठरला असला तरीही या घरातील दुसरी व्यक्ती सर्वात जास्त चर्चेत आहे. ती दुसरी व्यक्ती म्हणजेच तान्या मित्तल.
बिग बॉस 19 च्या घरात तान्या मित्तल कधी जोरदार भांडण करताना तर कधी टास्क मध्ये काही तरी कारनामे करताना दिसली. त्यानंतर सलमान खान ने तान्या मित्तलची चांगलीच क्लास लागल्याचेही आपण पहिले. तिने या बिग बॉसच्या घरात अनेक असे दावे केले कि, ती खूप श्रीमंत आहे. ती चांदीच्या बॉटल मध्ये पाणी पिते, तिच्या घरातील किचेन मध्ये लिफ्ट आहे. तिचे घर एक आलिशान असा राजमहाल सारखा बांगला आहे. असे अनेक दावे तिने केले. परंतु हे सर्वकाही खोटं असल्याचे सर्वांना वाटत होते. परंतु आता हे सर्वकाही खरे आहे की काय असं दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.
हे ही वाचा : होमबाऊंड चित्रपटापूर्वी ‘हे’ भारतीय चित्रपट देखील होते ऑस्करच्या यादीत
बिग बॉस 19 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल तिच्या ग्वाल्हेर येथील घरी पोहोचली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे स्वागत केले. तिच्या घराशेजारी मोठी गाड्यांची रांग बघायला मिळाली. स्वागतानंतर तान्या मित्तलने मोठ्या बंगल्यात एंट्री केली. यावरून असे वाटतंय कि, तिने केलेल्या दाव्यांपैकी सर्वकाही नाही परंतु थोड्या प्रमाणात तरी हे खरं असेल.
बिग बॉस मध्ये केले खोटे दावे
बिग बॉस 19 च्या घरात अनेकदा तान्या मित्तल तिच्या श्रीमंतीच्या गोष्टी सांगताना दिसली. एवढेच नाही तर तान्या मित्तलने बिग बॉस संपल्यानंतर मी तुमच्या घरी येते असं सलमान खानला म्हणताना दिसली. त्यानंतर सर्वांचे घर एवढे छोटे आहे की माझे साहित्य त्यांच्या घरात मावणार नाही असं देखील ती म्हणाली. आणि यावर सलमान खानने स्पष्ट सांगितले कि, ते 1 bhk मध्ये राहतात. तान्याने केलेले सर्व दावे खोटे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.












