Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सासऱ्याने धोंड्याच्या महिन्यात जावयाला दिली घोडी, अनोख्या गिफ्टची चर्चा…
ताज्या बातम्या

सासऱ्याने धोंड्याच्या महिन्यात जावयाला दिली घोडी, अनोख्या गिफ्टची चर्चा…

Gifted a mare to the son-in-law : इंधन दरवाढीचा सर्वात जास्त फटका जावयांना बसल्याचं दिसून येत आहे. धोंड्याच्या महिन्यात जावयाला सोने किंवा चांदीची वस्तू भेट म्हणून देतात. मात्र धाराशिवमध्ये एका सासऱ्याने जावयाला चक्क सिंधी जातीची घोडी भेट म्हणून दिली आहे. ही घटना माहिती होताच पंचक्रोशीत एकच चर्चा सुरु झाली आहे. मात्र सासऱ्याने जावयला घोडी भेट म्हणून का दिली आहे? धोंड्याच्या महिन्यात सोने-चांदी ऐवजी जावयाने घोडी भेट म्हणून का स्विकारली आहे? सिंधी जातीची घोडी का म्हणून दिलीय. याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.

सध्या देशभरात वाढती महागाई आणि सातत्याने होणारी इंधन दरवाढ यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर चालवताना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे खिशाला मोठी कात्री लागत आहे. याच इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता आपल्या पारंपरिक सण-उत्सवांवरही दिसायला लागलाय. सध्या सुरू असलेल्या अधिक मास धोंडे जेवणानिमित्ताने धाराशिव जिल्ह्यात एक अत्यंत अनोखी आणि कौतुकास्पद घटना समोर आली आहे. वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दराला कंटाळून येथील एका सासऱ्याने आपल्या जावयाला चक्क ‘सिंधी जातीची घोडी’ भेट म्हणून दिली आहे. या आगळ्यावेगळ्या भेटीची सध्या संपूर्ण पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे.

जावयाला सासऱ्याने सोने-चांदी ऐवजी घोडी भेट दिली

हा जावाई देखील खूपच मोठ्या मनाचा दिसत आहे. एखाद्या जावयाला सासऱ्याने सोने-चांदी ऐवजी घोडी भेट दिली असती तर त्याने वाद घातला असता. मात्र या जावयाने सासऱ्याने दिलेली भेट वस्तू मोठ्या आनंदाने स्विकारली आहे. जावयाने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, मला सासरच्या मंडळीने धोंड्याच्या महिन्यासाठी बोलावलं होतं. मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला शेती उपयोगी वस्तू भेट म्हणून देणार आहे. तिथे गेल्यावर मला कळालं की सासऱ्यांनी मला सिंधी जातीची घोडी भेट म्हणून दिली आहे.

पारंपरिक विचारसरणीला फाटा देत नवा आदर्श

हिंदू धर्मात धोंड्याच्या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात जावयाला मानाचे पान असते. सासरच्या मंडळींकडून जावयाला घरी बोलावून धोंड्याच्या जेवणाचा जंगी बेत केला जातो आणि त्याला ऐपतीप्रमाणे सोने किंवा चांदीची वस्तू, अंगठी, चेन किंवा कपडे भेट देण्याची जुनी परंपरा आहे. अनेक जावई सोने-चांदीचे दागिने दिले नाही म्हणून वाद घालताना दिसतात. तर काही जावई अधिक सोने-चांदी पाहिजे म्हणून वाद घालताना दिसतात. मात्र, धाराशिवमधील या सासऱ्याने पारंपरिक विचारसरणीला फाटा देत एक नवा आदर्श आणि नवा ट्रेंड सेट केला आहे. आजच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्यापेक्षा आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा विचार करता, जावयाचा प्रवास सुकर आणि दिमाखदार व्हावा यासाठी त्यांनी चक्क लाखो रुपयांची सिंधी जातीची घोडी जावयाच्या स्वाधीन केली.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts