Buldhana father suicide case : नवरा बायकोचे भांडणाने वेगळेच वळण घेतले. एका जन्मदात्याने चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही एकदम टोकाचे पाऊल उचलले. दोन मुली अन् दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून या बाप म्हणवणाऱ्याने स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भालांजन परिसरात घडली. ज्या मुळे समाजमन हादरून गेलंय.
बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील बालांजन गावात घडली आहे. या घटनेत विजय मुसा किरडिया वय 35 वर्ष असे या घटनेतील निर्दयी पित्याचे नाव असून पियुष किरडिया वय 2 वर्ष, पूर्वी किरडिया वय 4 वर्षे, प्राची किरडिया वय 5 वर्ष आणि प्रीत किरडिया वय 7 वर्ष वयाच्या या चिमुकल्यांना या निर्दयी बापाने संपवले. राजुरा शेत शिवारातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज
यामुळे जळगाव जामोद तालुक्याच्या सातपुडा पर्वतातील आदिवासी समाज बांधवांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर युवकाने त्याच्या पत्नीस जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर येथे तिच्या माहेरी काल रात्री सोडून दिल्याची माहिती प्राप्त झाली असून घरगुती वादातून सदर व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केल्या जात आहे.
या घटनेमुळे अनेक प्रश्न देखील उत्पन्न होत आहेत, सध्याचे धकाधकीचे जीवन पद्धती आणि मोबाईल चा अती वापर, त्यातून निर्माण होणारे राग द्वेष ज्यातून या घटना घडतात असे तज्ञ सांगतात, मात्र क्षण भरात संपूर्ण परिवार उद्ध्वस्त करणारी बुलडाणाची ही घटना संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी आहे, यासाठी ध्यान करणे किंवा रागाच्या वेळी थोडा वेळ शांत राहून मार्ग काढण्यासही सुचवतात.
एकंदरीत या घडणाऱ्या घटनांवर चिंतन करणे गरजेचे आहे, या घटना सध्याचे जीवनात होत असलेले बदल आणि त्यातून उत्पन्न होणारी मानसिक स्थिती कारणीभूत आहे, त्यावर विचार होणे गरजेचे आहे.











